
मुंबई : opअनेक दिवसापासून सर्वांचेच लक्ष्य लागून राहिलेला मराठा आरक्षणासंदर्भातील सरकारचा कृती अहवाल आज विधानसभा आणि विधीमंडळात मंजूर करण्यात आले. आज विधीमंडळात मराठा आरक्षणाचा सरकारचा कृती अहवाल सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहवाल विधानसभेत मांडला. या विधेयकात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. तर, मराठा समाजाचा SEBC प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे.
कृती अहवाल सादर केल्यानंतर विधानसभेतील सदस्यांनी अहवाल वाचनासाठी काही वेळ द्या, अशी विनंती केली. दुपारी यासंदर्भात कामकाजाला सुरुवात होताच कोणत्याही चर्चेविना विधेयक मंजूर झाले आणि मराठा समाजाच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले.
मुख्यमंत्र्यांनी अहवाल वाचन केल्यावर भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या. तर मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी सभागृहातील एक आमदार असलेल्या पक्षापासून ते अपक्ष आमदारांपर्यंत सर्वांचेच आभार मानले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही हे विधेयक मंजूर झाल्याची घोषणा केली. त्यानंतर पुन्हा सभागृहाबाहेर सर्वांनीच जल्लोष सुरु केला.
Leave a Reply