नृसिंहवाडीतील आयसीआयसीआय अकॅडमी फॉर स्किल्सकडून 4,800 हून अधिक गरजू युवकांना प्रशिक्षण

 

कोल्हापूर:आयसीआयसीआय अकॅडमी फॉर स्किल्स (आयसीआयसीआय अकॅडमी) ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या वर्गातील युवकांना शाश्वत स्वरूपाचा रोजगार मिळण्याच्या दृष्टीने मदत करण्याच्या हेतूने त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी आयसीआयसीआय फाउंडेशनने समावेशक वाढीसाठी स्थापन केलेली संस्था आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 4 हजार 800 हून अधिक गरजू युवकांना नृसिंहवाडी येथील आयसीआयसीआय अकॅडमीमध्ये प्रशिक्षण देवून त्यांना 100 टक्के रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
ऑक्टोबर 2013 मध्ये स्थापना झाल्यापासून या अकॅडमीने देशभर 24 केंद्र सुरू केली आहेत. गरजू व वंचित युवकांना 10 शाखांचे महत्त्वाचे व प्रॅक्टिकल प्रशिक्षण देणे, हे अकॅडमीचे उद्दिष्ट असून या 10 शाखा आहेत. विक्री कौशल्य, कार्यालय प्रशासन, इलेक्ट्रिकल व होम अप्लायन्सची दुरुस्ती, रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग दुरुस्ती, सेंट्रल एअर कंडिशनिंग, पम्प्स व मोटर दुरुस्ती, रंग लावण्याचे तंत्र, ट्रॅक्टर मेकॅनिक, टू व थ्री व्हीलर सर्व्हिस टेक्निशिअन आणि रिटेल सेल्स. सर्व विद्यार्थ्यांना विशिष्ट जीवनावश्यक कौशल्यांचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे, जसे एटिकेट व ग्रूमिंग, कम्युनिकेशन व फायनान्स. यामुळे त्यांना कामाच्या संघिटत वातावरणामध्ये जुळवून घेण्यासाठी मदत होईल. प्रशिक्षण देण्याबरोबरच, आयसीआयसीआय अकॅडमीच्या वतीने प्रशिक्षणार्थींना गणवेश, जेवण व अभ्यासक्रमासाठी सर्व आवश्यक साहित्य दिले जाते.
आयसीआयसीआय अकॅडमी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशिष्ट भौगोलिक ठिकाणाच्या अनुषंगाने विविध माध्यमांचा वापर करते. यामध्ये, निरनिराळ्या समुदायांमध्ये जागृतीपर कार्यक्रम आयोजित करणे, राज्याच्या विविध भागांत तरुणांसाठी समुपदेशन सत्रे आयोजित करणे, उमेदवार मिळवण्यासाठी राज्य सरकारची मदत घेणे, एनजीओंची मदत घेणे, रेफरल व वॉक-इन उमेदवारांचे आणि एम्प्लॉयरनी सुचवलेल्या उमेदवारांचे मूल्यमापन करणे, यांचा समावेश आहे.
नरसोबावाडी येथील केंद्रामध्ये तीन विषयांतील 3 महिन्यांचे अभ्यासक्रम चालवले जातात. रेफ्रिजरेशन व एसी दुरुस्ती, पम्प्स व मोटर दुरुस्ती आणि इलेक्ट्रिकल व होम अप्लायन्सची दुरुस्ती. इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेले आणि 18 ते 30 वर्षे वयोगटातील असणारे गरीब तरुण या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू शकतात.
24 डिसेंबर  2013 रोजी स्थापन करण्यात आलेल्या, नरसोबावाडी येथील अकॅडमीने 30 सप्टेंबर 2018 पर्यंत 4,800 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे या केंद्राने राज्यातील गरीब युवकांना प्रशिक्षण मिळावे, यासाठी ब्लु स्टार इंडिया प्रा. लि. श्निडर इलेक्ट्रिक इंडिया व क्रॉम्प्टन ग्रिव्ह्ज यांच्याशी नॉलेज पार्टनर म्हणून  भागीदारी केली आहे. केंद्रामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी केंद्राने 110 हून अधिक इंडस्ट्री पार्टनरशीही भागीदारी केली आहे. नृसिंहवाडी येथील अकॅडमीतील प्रशिक्षणार्थींना व्हर्पूल ऑफ इंडिया लिमिटेड,आयएफबी इंडस्ट्रीज लि., रिलायन्स रेसक्यू लि., युरेका फोर्ब्ज लि. व एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रा. लि. अशा नामवंत इंडस्ट्री पार्टनरनी नियुक्त केले आहे. सध्या,या सेंटरमध्ये 329 हून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.आयसीआयसीआय अकॅडमी फॉर स्किल्सने महाराष्ट्रातील सर्व केंद्रांमध्ये 20 हजार 200 हून अधिक जणांना प्रशिक्षण दिले आहे.याविषयी बोलताना,आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक व आयसीआयसीआय फाउंडेशन फॉर इन्क्लुजिव्ह ग्रोथच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य अनुप बागची म्हणाले“आयसीआयसीआय फाउंडेशनने गरीब व गरजू युवकांना महत्त्वाची कौशल्ये स्थानिक स्तरावर शिकण्याची संधी देऊन समावेशक वाढीला चालना देण्यामध्ये योगदान देण्याच्या हेतूने 2013 मध्ये आयसीआयसीआय अकॅडमी फॉर स्किल्स सुरू केली. कुशल कर्मचाऱ्यांची वाणवा कमी करणे व नोकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत करणे, या हेतूने अकॅडमीचे कार्यक्रम आखले जातात. तसेच, हे कार्यक्रम उद्योगांसाठी महत्त्वाचे असलेले प्रॅक्टिकल प्रशिक्षण देण्यावर भर देतात. या प्रशिक्षणामुळे युवकांना स्थानिक स्थरावर शाश्वत रोजगार मिळू शकतो.
आतापर्यंत,आयसीआयसीय अकॅडमी फॉर स्किल्सची स्थापना झाल्यापासून या कौशल्य अकादमीने एक लाखाहून अधिक जणांना प्रशिक्षण दिले असून त्यामध्ये महिलांची संख्या 42,000 हून अधिक आहे. प्रशिक्षण दिलेल्या सर्व युवकांना अकादमीने 100% प्लेसमेंट  दिले आहे, ही आनंदाची बाब आहे. आमच्या प्रयत्नांमुळे युवक आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनत आहेतच, शिवाय स्थानिक अर्थव्यवस्थाही यामुळे भरभराटीला येत आहे.
आज, आयसीआयसीआय अकॅडमी फॉर स्किल्स, आयसीआयसीआय डिजिटल व्हिलेजेस आणि रुरल सेल्फ-एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स (आरएसईटीआय) यामार्फत आम्ही 3.50 लाखांहून अधिक युवकांना प्रशिक्षित केले आहे आणि त्यामध्ये महिलांची संख्या 50% हून अधिक आहे. यावेळी आयसीआयसीआयच्या वरिष्ठ व्यवस्थापक कॉर्पोरेट कम्युनिकेशन अपराजिता सिकंदर,श्रद्धा शुक्ला उपस्थित होत्या.      

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!