
(डॉ.सुभाष देसाई): दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर दोन महत्त्वाचे खटले चालले त्यापैकी पहिला २७ जानेवारी १८५८ त्यावेळचा दिल्लीचा राजा मोहम्मद बहादूर शहा यावर आणि त्यानंतर नोव्हेंबर १९४५ ला .आझादहिंद सेनेचे कॅप्टन शाह नवाज खान, कॅप्टन जी. एस. धिल्लन .कॅप्टन पी के सहगल या आझादहिंद सेनेच्या सेनापतींच्या वर ब्रिटिशानी खटला चालवला .बहादूरशहा या राजाला ट्रान्सपोर्टेशन ट्रू लाइफ आणि डिपोर्टेशन टु रंगून अशी शिक्षा ब्रिटिशांनी दिली.राजा बहादूर शाह वरही असाच आरोप केला होता आणि त्याला रंगूनला पाठवले तेथे १८६८ ला तो वारला
या तीन ऑफिसर्सवर ब्रिटिश सरकारविरुद्ध सशस्त्र युद्ध छेडले व असे आणखी काही आरोप त्यांच्यावरती लादले होते . त्या वेळेला गंभीर शिक्षा ब्रिटिशांनी ठोठावली. या खटल्याकडे साऱ्या भारताचे लक्ष लागून राहिले होते
(पुढे.कर्नल साहेगल आणि कर्नल ढिल्लन यांनी नेताजी सुभाष चंद्रांच्या २३ जानेवरी १९९० रोजी ९३ व्या जयंती समारोहात मणिपूरला भेट देऊन कार्यक्रमात सहभागी झाले .)
हा खटला अनेक कारणामुळे गाजला .पंडित जवाहरलाल नेहरूंनी अनेक वर्षे जो आपला काळा कोट बाजूला ठेवलेला होता तो पुन्हा चढवला आणि INA ऑफिसर्सना वाचवण्यासाठी जी कायदेपंडितांची फलटन उभा होती त्यात सामील झाले.या यामध्ये भुलाभाई देसाई सर तेज बहादूर सप्रू डॉक्टर कैलाशनाथ काटजू बद्री दास असफ अली कनवर सर दीलिप सिंग .लाहोर कोर्टाचे माजी न्यायाधीश बक्षी सर तजे चंद .लाहोर हायकोर्टाचे माजी न्यायाधीश अच्रू राम. कॅप्टन पी के सैगलचे वडील पटना हायकोटॆचे जज ई.
प्रत्यक्ष खटला चालण्या पूर्वी भुलाबाई देसाईंनी शहानवाज खान आणि सायकल नि धिल्लन यांची तुरुंगांमध्ये भेट घेतली आणि त्यांना विचारलं तुम्हाला तुमचं आयुष्य वाचवण्यासाठी हा खटला मी तडजोड करू काय एवढी तीनही ऑफिसर्सनी तडफदार उत्तर दिलं मुळी८च नाही आणि मग त्यानंतर भुलाबाई देसाई म्हणाल तुम्ही माझे काम सोपा केला आता मी बघेन तिच्या भारतीय स्वातंत्र्यासाठी तुम्ही काम केलेत तर
,त्यासाठी तुम्ही फासावर गेला तरी हरकत नाही जेव्हा प्रत्यक्ष खटला सुरू झाला तर हजारो लोक लाल किल्ल्याच्या हिरवळीवर जमले होते
खटल्याचा निकाल काय लागतो हे लोक डोळ्यात प्राणाहून पाहात होते त्या वेळेला या तीन ऑफिसबद्दल एक्शन सहानुभूतीची अनैतिक पाठिंबाच लाटच उसळलेली होती वातावरणात शे तप्त होते अशा वेळेला भुलाबाई देशांनी आपले बचाव पक्षाची भूमिका मांडताना ते म्हणाले की अशा दिनद सेनेने स्वतंत्र भारताचे एक सरकार स्थापन केले होते आणि त्याच्यासाठी या ऑफिसर्सनी काम केले आहे त्यामुळे हे प्रिझनर अॉफ वॉर POW ठरतात .आणि ज्या सरकारवर गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न झाला आहे अन्याय झाला आहे त्या सरकारला बंड करण्याचा आणि युद्ध छेडण्याचा पूर्ण अधिकार आहे त्या देशातील नागरिकांना स्वातंत्र्यासाठी शत्रू वर् आक्रमण करता येते.आझाद हिंद लष्कराला ब्रिटीश राणी विरुद्ध युद्ध केल्याचा आरोप लावता येणार नाही दोन स्वतंत्र राष्ट्रांना परस्परांविरुद्ध केलेले ते युद्ध आहे त्यामुळे या तीन अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करायला हवी त्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षा देण्याचा अधिकार ब्रिटीश सरकारला नाही
या प्रभावी मांडणीमुळे वादविवादामुळे आणि भारताच्या कोट्यवधी जनतेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेच्या मागे असणाऱ्या सदिच्छांची सहानुभूतीमुळे ब्रिटीश सरकारला गुडघे टेकावे लागले आणि त्यांची मुक्तता करावी लागली
दुर्दैवाने मोदी सरकारला नेताजी आणि नेहरू यांच्यामध्ये भांडणे लावून पंडित नेहरू प्रतिमा मलीन करा ज्योती त्यांनाही भान राहिले नाही की आझादहिंद सेनेच्या सेनापतींना मुक्त करण्यासाठी नेहरूंनी वकील पत्र दिले होते
या खटल्याचे वैशिष्ट्य सोहत हा खटला म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे दोन रूपे होती आणि भारतीय लोकांच्या स्वातंत्र्याची प्रबळ इच्छा आणि ब्रिटिश सरकार या मधला हा तणाव होता ब्रिटीश सरकारला भारतीय स्वातंत्र चोर मी हि मान्य करावी लागली आणि आझाद हिंद सेना आणि नेताजी सुभाषचंद्र हे स्वातंत्र्य वीर ठरले
दुसर्या महायुद्धामध्ये १० मे १९४२ ला जपानने मणिपूरवर बॉम्ब फेकले .जपानी पूर्व आशियातून अँग्लो अमेरिकन फौजांना पिटाळून लावले होते आणि ती ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त केले होते ब्रिटिशांच्या ताब्यात असणारे भारतीय सैनिकांना नेताजी सुभाषचंद्रांनी मुक्त करून आझादी सेनेमध्ये सामील करून घेतले २१ऑक्टोबर१९४३ ला मध्यरात्री त्यांनी आझाद हिंद सरकार स्थापन केले त्याला नऊ देशांनी मान्यता दिली.या सरकारने ब्रिटिश सरकारविरुद्ध युद्ध पुकारले जपान सरकारशी करार केला त्यानुसार आझादी सेना आणि जपानी लष्कर भारतातील ब्रिटिश फौजांना हाकलून देईन आणि तो भाग आझादी सेनेच्या ताब्यात दिला जाहीर नेताजींनी सर्व भारतीयांना आव्हान केले “तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा” विविध भाषेमध्ये पॅम्प्लेट्स काढून नेताजींनी वाटली त्यापैकी काही लुंग्यागाव आणि तेची पतनि ह्यूजियान या दोघांनी ती मणिपूरमध्ये आणून लोकांच्यामध्ये वाटली. इम्फाळमध्ये वाटली तो संदेश पाहून अनेक जण नेताजीना जाऊन भेटले आणि आझादी सेनेमध्ये दाखल झाले आझाद हिंद सेना आणि जपानी सैनिक मोईरंगला आले आणि तेथील ब्रिटिशांना हाकलून दिले मोईरंग जिंकल्यावर १८ एप्रिल १९४४ रोजी भारताचा तिरंगा झेंडा फडकवला कर्नल मलिक तिथे उपस्थित होते अशारितीने मोईरंग हे ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून स्वतंत्र झालेल्या भारताचा पहिला भाग ठरला
७ मे १९४४ूरोजी इंडो बर्मा बॉर्डर क्रॉस करून आझादहिंद सेना आणि जपानी सेना इंफाळच्या दिशेने आगेकूच करत होती फक्त आठ किलोमीटर अंतरावर हे सैन्यआले असताना ब्रिटिशांनी माघार सुरुवात केली आणि एक दोन दिवसांतच इंफाळ हातांमध्ये पडणार अशी चिन्हे दिसू लागली सैनिकांना दारूगोळा कमी पडू लागला त्यातच मुसळधार पाऊस झाला आणि रोगराईमुळे सैनिक पटापट मरु लागले .
लढाईला, नेताजींच्या स्वप्नांना टर्निंग पॉइंट मिळाला .याच काळात अमेरिकेने ६ व९अॉगसट १९४५ ला जपानवर ,हिरोशिमा नागासिकीवर अणुबॉम्ब टाकल . बेचिराख झालेला जपान नेताजींना पाठिंबा देणे शक्य नव्हते . ति परिस्थिती पाहून नेताजींनी ठरवले की पाठीमागे जायला हे .सैन्याला शरण जायला सांगून नेताजी तैवानकडे निघाले.तैवान ते टोकियो विमान उड्डाणांमध्ये विमान कोसळले आणि त्या अपघातात नेताजींचे निधन झाले.
Leave a Reply