प्रख्यात बालरोगतज्ञ डॉ.प्रकाश संघवी यांना राष्ट्रीय स्तरावरील फेलोशिप

 

कोल्हापूर: मातेच्या उदरात २८० दिवस भरण्याअगोदर जी नवजात अर्भक जन्माला येतात त्यांना ‘प्री मॅच्युअर बेबी’ म्हणतात. अशी बालके जगण्याची आणि जगली शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ होण्याची शक्यताही फारच कमी असते. १९८०च्या दशकात ही परिस्थिती प्रगत वैद्यकीय ज्ञान आणि साधन सामुग्री अभावी खूपच गंभीर होती. अशा स्थितीत आपल्या सर्व वैद्यकीय ज्ञान आणि कौशल्य पणाला लावून त्यांना एक प्रकारे पुनर्जन्म देण्याचे काम कोल्हापुरातील बालरोग तज्ञ करत आहेत.१९८४ सालापासून आजतागायत सुरू झालेली ही त्यांची वैद्यकीय सेवा आजही कार्यरत आहे. आणि यापुढेही सुरूच आहे.

या त्यांच्या पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेची दखल राष्ट्रीय स्तरावरील भारतीय बालरोगतज्ञ म्हणून घेतली गेली. देशभरातील तीस हजारहुन अधिक बालरोग तज्ञ यांच्या मधून डॉ. प्रकाश संघवी यांची राष्ट्रीय स्तरावरील फेलोशिपसाठी निवड झाली. ‘फेलोशिप इन इंडियन अकडमी ऑफ पेडियाट्रिक’ च्या वतीने अतिशय प्रतिष्ठेची ही फेलोशिप डॉ. संघवी यांना मुंबई येथे प्रदान करण्यात आली. याबद्दल सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला. या निमित्ताने डॉ. संघवी यांनी आज पत्रकारांशी मनमोकळेपणाने संवाद साधला.
पस्तीस वर्षापूर्वी अतिशय कमी साधनसामुग्री मध्ये फक्त अनुभवाच्या जोरावर अनेक बालकांना जीवदान दिले. आज कोल्हापूरमध्ये प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान, औषध उपचार व कौशल्य उपलब्ध आहे. तरीही काही मर्यादा असतात. निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. यामुळे निसर्गला समांतरच काम करणे योग्य ठरते. जगातील एकूण २६ आणि महाराष्ट्रातील तीन बालरोग तज्ञांना हा सन्मान दिला गेला. त्यात माझी निवड झाली. या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्राने दखल घेतल्या ची प्रतिक्रिया डॉ. संघवी यांनी व्यक्त केली. यावेळी सौ. कल्पना संघवी, डॉ. विपुल संघवी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!