राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार मुन्ना उर्फ धनंजय महाडिक यांनी अगदी साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी झाली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उद्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्य प्रचारास सुरुवात होणार आहे. आजवर संसदेत शेकडो प्रश्न उपस्थित करून कोल्हापूर येथील विमानतळ, रेल्वे, औद्योगिक प्रश्न,नैसर्गिक आपत्तीत सहकार्य, महिला सबलीकरण,पासपोर्ट कार्यालय,शाळांना संगणक याचबरोबर समाजाच्या प्रत्येक घटकासाठी उपक्रम, सहाय्य करून जिल्ह्याच्या विकासाचे रोल मॉडेल बनवले आहे.त्यामुळे विकास कामांच्या जोरावर या निवडणुकीत जनता मला साथ देईल असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.यावेळी खासदार राजू शेट्टी,आमदार हसन मुश्रीफ,संध्यादेवी कुपेकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे,भगवान काटे,अरुंधती महाडिक, ऋतुराज महाडिक, महापौर सरिता मोरे यांच्यासह आघाडी चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!