वेकंटराम ममीलपल्‍ले यांची रेनॉ इंडियाच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालकपदी नियुक्‍ती

 

कोल्हापूर :लाभदायी विस्‍तारीकरणावर धोरणात्‍मक फोकस, रेनॉचा ग्राहककेंद्री दृष्‍टीकोन आणि महत्‍त्‍वाकांक्षेअंतर्गत एकजूटीने काम करत कार्यक्षमतेला चालना देण्‍यावर लक्ष केंद्रितयावर्षी नवीन उत्‍पादनाच्‍या सादरीकरणासाठी सज्‍ज, जे ख-या अर्थाने क्रांतिकारी ठरेल.भारतीय प्रवासी व्‍हेइकल बाजारपेठ २०१८मध्‍ये जर्मनीला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी बाजारपेठ बनली. या बाजारपेठेने आता २०२२ पर्यंत तिसरी सर्वात मोठी ऑटोमोटिव्‍ह बाजारपेठ बनण्‍याचे ध्‍येय ठेवले आहे. भारतीय ऑटोमोबाइल बाजारपेठेमधील नवीन कंपनी रेनॉ इंडियाने गेल्‍या वर्षी ५,००,००० विक्रीचा टप्‍पा पार केला. हा यशस्‍वी टप्‍पा गाठत कंपनी भारतात सर्वात जलद वाढ साधणारी ऑटोमोबाइल ब्रॅण्‍ड बनली. भारत ही ग्रुपे रेनॉसाठी धोरणात्‍मक बाजारपेठ आहे. कंपनीकडे रेनॉच्‍या मध्‍य-सत्र योजनेच्‍या यशासाठी निश्चित ‘भारतीय धोरण’आहे.    
रेनॉने वेकंटराम ममीलपल्‍ले यांची देशातील नवीन मुख्‍य कार्यकारी अधिकारी व व्‍यवस्‍थापकीय संचालक म्‍हणून घोषणा केली. त्‍यांच्‍याकडे ऑटोमोटिव्‍ह क्षेत्रातील २८ वर्षांचा अनुभव आहे. ते भारत व सार्क देशांतील रेनॉच्‍या कार्यसंचालनांच्‍या नेतृत्‍वाची धुरा सांभाळतील. यापूर्वी वेकंटराम रशियातील रेनॉ-निस्‍सान-एव्हटोव्हजचे प्रमुख होते. त्‍यांनी या कंपनीमध्‍ये प्रमुख परिवर्तन, प्रबळ वाढ आणि लाभासाठी लक्षणीय योगदान दिले. ग्रुपे रेनॉमध्‍ये रुजू होण्‍यापूर्वी वेकंटराम यांनी विविध भारतीय व जागतिक ओईएममध्‍ये विविध आघाडीच्‍या पदांचा कार्यभार सांभाळला आहे. 
वेकंटराम यांना भारतीय ऑटोमोटिव्‍ह क्षेत्राचा दांडगा अनुभव आहे. यामध्‍ये पुरवठा शृंखला व्‍यवस्‍थापन, दर्जा,उत्‍पादन व लॉजिस्टिक्‍स या विभागांचा समावेश आहे. ज्‍यामुळे कंपनीला भारतात रेनॉसाठी व्‍यापक विस्‍तारीकरण धोरणाची अंमलबजावणी करण्‍यामध्‍ये मदत होईल. ते त्‍यांच्‍या अगोदरच्‍या कंपन्‍यांमध्‍ये कार्यकारी समिती, मंडळ व आंतरराष्‍ट्रीय मंडळांचे देखील सदस्‍य राहिले आहेत.
रेनॉ इंडियामध्‍ये रुजू होण्‍याच्‍या आदेशाबाबत बोलताना वेकंटराम ममीलपल्‍ले म्‍हणाले, ”सुरूवातीला मी कंपनीसाठी तीन व्‍यापक उद्देश निश्चित केली आहेत. पहिला म्‍हणजे कंपनी सहयोगात्‍मक कामाच्‍या सर्व कंपन्‍यांसोबत सहयोगाने ‘एका ध्‍येयाशी संलग्‍न एक टीम’ म्‍हणून काम करेल. हा प्रमुख उद्देश आहे. दुसरा म्‍हणजे सर्व व्‍यावसायिक क्षेत्रांमध्‍ये ‘ग्राहककेंद्री’दृष्‍टीकोनाला प्राधान्‍य देणे. ज्‍यामुळे दर्जात्‍मक उत्‍पादने (निर्माण व मान्‍यता) निर्माण करण्‍यामध्‍ये मदत होईल आणि अभियांत्रिकी, उत्‍पादन, पुरवठावदार व विक्रेत्‍यांवर देखील लक्ष केंद्रित करता येईल. तिसरा उद्देश म्‍हणजे आमच्‍या मध्‍य-सत्र योजनेचा भाग म्‍हणून पुढील तीन वर्षांमध्‍ये आमचा फायदेशीर विक्री आवाका दुप्‍पट करत १५०,००० युनिट्सपर्यंत घेऊन जाणे.”
रेनॉ यंदा नवीन उत्‍पादन देखील लॉंच करणार आहे, जे ख-या अर्थाने क्रांतिकारी ठरेल. एसयूव्‍ही हा रेनॉचा महत्‍त्‍वपूर्ण व भारतातील जलदगतीने विकसित होणारा विभाग असून उत्‍पादन-संबंधी धोरण कंपनीची क्षमता वाढवण्‍याप्रती काम करेल आणि विविध भारतीय ग्राहकांच्‍या वाढत्‍या गरजा व प्राधान्‍यांची पूर्तता करण्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या वाढत्‍या विभागांची पूर्तता करेल. तसेच हे धोरण भारतीय ऑटोमोटिव्‍ह क्षेत्रामध्‍ये नवीन विभाग व उपविभागांची निर्मिती करेल. रेनॉची आगामी उत्‍पादने भारतासाठी भारतातच डिझाइन, रचना, विकास व उत्‍पादित केली जातील.  रेनॉ डीलर भागीदारांना देखील फायदा होण्‍यावर समान भर देण्‍यावर लक्ष केंद्रित करेल. ज्‍यामुळे आवाका व ऑफरिंग्‍जमध्‍ये वाढ होऊन रेनॉचे महसूल वाढवण्‍यामध्‍ये मदत होईल.
१२० वर्षांचा जागतिक वारसा लाभलेली रेनॉ कंपनी जगातील सर्वात मोठ्या ऑटोमोटिव्‍ह अलायन्‍सचा भाग आहे. रेनॉने योग्‍य मुलभूत गोष्‍टी करण्‍यासाठी बरीच गुंतवणूक केली आहे आणि त्‍याद्वारे भारतातील रेनॉसाठी प्रबळ पाया रचला आहे. यामध्‍ये चेन्‍नईमधील अत्‍याधुनिक उत्‍पादन केंद्र (प्रतिवर्ष ४,८०,००० युनिट्स निर्माण क्षमता),जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान केंद्र, जागतिक दर्जाची दोन डिझाईन केंद्रे आणि २ जागतिक दर्जाची लॉजिस्टिक्‍स केंद्रे यांचा समावेश आहे.
सध्‍या, रेनॉचे भारतीय ऑटोमोटिव्‍ह बाजारपेठेमध्‍ये मर्यादित कव्‍हरेज असून त्‍यांचा विद्यमान पोर्टफोलिओ बाजारपेठेचा ४० टक्‍क्‍यांहून कमी भाग व्‍यापून घेतो. असे असले तरी रेनॉ हा भारतातील पहिल्‍या क्रमांकाचा युरोपियन ऑटोमोटिव्‍ह ब्रॅण्‍ड आहे. रेनॉचे भारताच्‍या ऑटोमोटिव्‍ह बाजारपेठेच्‍या नवीन व वाढत्‍या विभागांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी सुस्‍पष्‍ट उत्‍पादन धोरण आहे.
कारची कमी पोहोच व अनुकूल ग्राहकवर्ग असलेल्‍या भौगोलिक क्षेत्रांसह वाढत्‍या क्रय उत्‍पन्‍नामुळे भारतीय ऑटोमोबाइल बाजारपेठेमध्‍ये विकासाची मोठी संधी आहे. रेनॉ या विकासाच्‍या भवितव्‍याला योग्‍य आकार देण्‍यास सज्‍ज आहे.
रेनॉ इंडिया प्रा. लि. ही रेनॉएस.ए.एस.,फ्रान्सच्या संपूर्ण मालकीची कंपनी आहे. रेनॉ इंडिया कार्स ओरागादम, चेन्‍नई येथील कारखान्यात तयार केल्या जातात आणि त्यांची क्षमता वार्षिक ४८०,००० एकक आहे. सध्या, रेनॉ इंडियाची उल्लेखनीय विक्री व सेवा दर्जासह देशभरातील ३५० हून अधिक विक्री व २६४ सेवा सुविधांची व्यापक उपस्थिती आहे.
रेनॉ इंडियाची उत्तम उत्पादन श्रेणी व सेवा यांना ग्राहकांमध्ये आणि उद्योगाच्या तज्ञांमध्ये एक उत्तम मागणी असून त्यांनी ६० किताब संपादित केले आहेत. त्यामुळे रेनॉ हा एकाच वर्षात देशातील सर्वोत्तम मागणीच्या ऑटोमोटिव्ह ब्रँडपैकी एक ठरला आहे. रेनॉ क्विडने ३२ पुरस्कार संपादित केले आहेत, ज्यामध्ये १० ‘कार ऑफ द इअर’ अॅवॉर्ड्‌सचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!