
कोल्हापूर: येत्या लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांना बहुजन सेनेच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. बहुजन सेनेच्या कार्यकर्त्यांनी पाठिंब्याचे पत्र खासदार महाडिक यांना दिले आणि निवडणुकीत खासदार महाडिक यांना मताधिक्य मिळावे, यासाठी जिल्ह्यात सर्वत्र प्रचार करणार असल्याचेही सांगितले. समाजातील वंचित, उपेक्षित, निराधार आणि दिव्यांगांची काळजी घेण्याचे काम खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे. अपंगांना साहित्य वाटप, अपंगांच्या विविध स्पर्धांना प्रोत्साहन, अंधांना तिरूपती दर्शन, दिव्यांगांना हवाई सफर यासारख्या उपक्रमातून माणूसकी जपणार्या खासदार महाडिक यांच्या पाठीशी जिल्हयातील दिव्यांग उभे राहतील, अशी ग्वाही बहुजन सेनेच्या पदाधिकार्यांनी खासदार महाडिक यांना दिली. तसेच कागल तालुक्यातील नानीबाई चिखलीच्या सावित्रीबाई फुले अपंग आणि निराधार पुनर्वसन संस्थेनेही खासदार महाडिक यांना पाठिंबा देत असल्याचे पत्र दिले. खासदार महाडिक यांनी या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच भविष्यातही दिव्यांगाच्या पुनर्वसनासाठी अखंडपणे कार्यरत राहू, असे सांगितले. यावेळी बहुजन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदीनाथ साठे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष महादेव सोनटक्के, जिल्हाध्यक्ष अमित पाटील, महिला जिल्हाध्यक्षा रेखा पाटील, दीपक आकुर्डे, बाबासाहेब आवळे, सागर टिपुगडे, मनीषा कांबळे, दीपाली परीट, अमृता कांबळे, आकाश कांबळे, सुनील पाटील, गीता कळंबकर, अशोक पोवार, शिवाजी पोवार, रामचंद्र पोवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Leave a Reply