
कोल्हापूर : मानवी आयुष्यातील वयानुरूप करायचा कामानुसार आपल्या धर्मवेत्यांनी चार आश्रम सांगितले आहेत त्यातील गृहस्थाश्रमातील सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावल्यानंतर संसारातून निवृत्त होऊन आपल्या अनुभवाचा फायदा समाजासाठी करून देण्यासाठी वानप्रस्थाश्रम सांगितला आहे परंतु भारतीय संस्कृतीवर झालेल्या अनेक परकीय आक्रमणामुळे कालानुरूप ही प्रथा मागे पडली. त्याचे अनेक दुष्परिणाम आपण भोगत आहोत.
हीच संस्कृती पुनरुज्जीवित करण्याचा छोटासा प्रयत्न सावली परिवार आपल्या नवीन उपक्रमाद्वारे करण्याचा प्रयत्न करणार आहे यासाठी घरांमध्ये वाद असणे गरजेचे नाही वृद्धाश्रम नसून समाजातील अनुभवी ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग असणार आहे असे नागरिक आपल्या समृद्ध अनुभवाचा फायदा अनेक विविध उपक्रमांद्वारे करून देतील यामध्ये संस्कार अकॅडमी ट्युशन क्लासेस साहित्य कला प्रशिक्षण विविध सामाजिक संस्थांमध्ये योगदान सारख्या अनेक उपक्रमांचा समावेश असणार आहे या प्रकल्पाचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शनिवारी सहा एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धगिरी मठाचे मठाधिपती श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी हे असणार आहेत यावेळी शहीद अभिजीत सूर्यवंशी यांच्या मातोश्री वीर माता मनीषा सूर्यवंशी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री बाळासाहेब कामत आणि पाचगाव ग्रामपंचायतीचे सरपंच श्री संग्राम पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती किशोर देशपांडे सुभाष साबळे अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
या वानप्रस्थ ची वैशिष्ट्ये अशी आहेत यामध्ये सर्वच प्रवेशताना सन्मानाची वागणूक मिळणार आहे जनरल स्पेशल सेमी स्पेशल कपल रुमची सोय या ठिकाणी आहे शांत हवेशीर आणि स्वच्छ परिसर आहे उत्कृष्ट आहार व्यवस्थापन पाण्याची विशेष काळजी घेतली जाणार आहे गणपती मंदिराची प्रसन्न सान्निध्य लाभलेल्या हे मनोरंजनासाठी लायब्ररी टीव्ही म्युझिक सिस्टिम सारखे विविध माध्यमे या ठिकाणी उपलब्ध आहेत आठवड्यातून दोनदा डॉक्टरांची या ठिकाणी असते योगा प्राणायाम चे वर्ग या ठिकाणी भरविले जातात याशिवाय दुर्धर आजारामुळे वा अपघातामुळे परावलंबित्व सावली केअर सेंटर च्या सेवांची उपलब्धता या ठिकाणी केली जाते .
संस्थेमध्ये ८० व्यक्ती राहण्याची सोय उपलब्ध आहे संस्था करत असलेल्या शुल्कामध्ये तीन चहा न्याहारी दोन वेळचे जेवण रहिवास यांचा समावेश आहे याशिवाय संस्थेने आयोजित केलेल्या विविध मनोरंजनात्मक धार्मिक कार्यक्रमांचा ही त्यांना आनंद घेता येणार आहे वानप्रस्थ क्लबमध्ये मानद आश्रयदाता आणि कार्यकर्ता अशा तीन प्रकारचे सदस्यत्व असणार आहे त्या ग्रुपमध्ये कोणीही व्यक्ती मग ती संस्थेतील असो निवासी असो अथवा नसो सभासद होऊ शकणार आहे या वानप्रस्थ च्या माध्यमातून बालसंस्कार वर्ग पहिली ते दहावी ट्युशन क्लासेस वाचनालय व अभ्यासिका मॅरेज चाइल्ड कौन्सिलिंग योगा प्राणायाम ध्यानधारणा ज्येष्ठांसाठी कॉम्प्युटर इंटरनेट मोबाइल ऑपरेशनचे वर्ग पाककृती रांगोळी हस्तकला यासारखे महिलांसाठीचे वर्ग सुंदर हस्ताक्षर चित्रकला संभाषण कौशल्य यासारखे विद्यार्थ्यांसाठी चे वर्ग लेखक आपल्या भेटीला काव्यसंध्या वाचन कट्टा यासारखे साहित्य क्षेत्रातील उपक्रम गायन कला संगीत क्लास प्राचीन व अर्वाचीन इतिहास खगोलशास्त्र आरोग्य अशा विषयांवरील व्याख्याने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन भ्रमंती उपक्रमांचे आयोजन असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. अशी माहिती किशोर देशपांडे यांनी पत्रकार यांनी दिली आहे.
Leave a Reply