
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाई, रा.स.पक्ष युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या कोल्हापूर शहरातील प्रचाराचा शुभारंभ हिंदू नववर्ष आणि गुडीपाडव्याचे औचित्य साधून “श्री स्वामी समर्थ मंदिर, कोटीतीर्थ, कोल्हापूर” येथून करण्यात आला. कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मताधिक्याने शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या विजयाची गुडी उभारणार असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
आज सकाळी श्री स्वामी समर्थ मंदिर, कोटीतीर्थ येथे युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक, आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, शिवसेना महिला आघाडी शहर संघटक सौ. मंगलताई साळोखे यांच्या सह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कोल्हापूर शहरातील प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी “शिवसेना जिंदाबाद”, “कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला”, प्रा. संजय मंडलिक यांच्या विजयाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. भगव्या टोप्या, स्कार्प परिधान केलेलं शिवसैनिक आणि भगवे झेंडे यांनी प्रचार फेरी परिसर शिवसेनामय करून टाकला.
यावेळी बोलतना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, शहरात ५० स्टेज सभा, महिला हळदी कुंकू कार्यक्रम, विभागवार मेळावे, भागाभागातील प्रचार फेऱ्या, टू व्हीलर रॅली आदींद्वारे थेट मतदारांशी संपर्क साधला जाणार असल्याचे सांगत, निवडणुकीकरिता थोडाच अवधी शिल्लक असून युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या विजयाची गुडी उभारण्यासाठी शिवसैनिकांनी अहोरात्र कष्ट घेण्याचे आवाहन केले. प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या कार्यक्रमांना जनता उस्फूर्त प्रतिसाद देत असून, जनतेने ही निवणूक हाती घेतली असून, या निवडणुकीत प्रा.संजय मंडलिक यांचा विजय निश्चित झाला असल्याचे सांगितले.
यानंतर राजारामपुरी प्रभागातील प्रचारफेरीचे नियोजन करण्यात आले. ही प्रचार फेरी कोटीतीर्थ मंदिर मार्गे मातंग वसाहत – पोपटराव जगदाळे हॉल – राजारामपुरी १ ली गल्ली – जनता बझार चौक – राजारामपुरी मेन रोड मार्गे राजारामपुरी १२ वी गल्ली मारुती मंदिर येथे समाप्त करण्यात आली.
उद्यापासून शहरात १५ प्रभागवार प्रचार फेऱ्या काढणेत येणार आहेत. याचबरोबर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने प्रभागवार हळदी – कुंकू कार्यक्रम, युवा सेनेच्या वतीने महाविद्यालयावरील युवा मतदारांशी संपर्क साधनेत येणार आहे. त्याचबरोबर डिजिटल स्क्रीन गाड्या, रिक्षा याद्वारे आधुनिक प्रचाराद्वारे मतदारांचे लक्ष वेधले जाणार आहे. या प्रचारादरम्यान शिवसेनेने आजतागायत केलेल्या अनेक समाजहिताच्या कामांची माहिती त्यांना देणेत येणार आहे. तसेच मुख्य स्टेज सभांमध्ये कॉंग्रेस- राष्ट्रवादी सरकारच्या काळात झालेले घोटाळे, भ्रष्टाचार या उलट युती सरकारच्या काळात झालेली विकास कामे योजना, दहशतवाद्यांविरोधात कारवाया, कोल्हापूर जिल्ह्याचा विकास, प्रलंबित योजना, गेल्या ५ वर्षातील राज्यातील युती शासनाचे काम योजना या विषयांद्वारे मतदारांपर्यत पोहचून शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. यासह एल.ए.डी. स्क्रीन गाडीवर शिवसेनेने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्यासाठी केलेल्या आंदोलनाचा, विकासात्मक, सामाजिक आणि सांस्कृतिक कामाचा आढावा घेणारी चित्रफित, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख वंदनीय उद्धवजी ठाकरे, पंतप्रधान पदाचे उमेदवार श्री. नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या चित्रफित आणि प्रा. संजय मंडलिक यांच्या आजवरच्या विधायक कार्याचा निवडणूक प्रचाराची चित्रफित दाखवली जाणार आहे.
दरम्यान प्रचार शुभारंभ प्रसंगी युतीचे संजय गांधी योजनेचे किशोर घाटगे, महेश उत्तुरे, फेरीवाले सेना शहरप्रमुख धनाजी दळवी, जयवंत हारुगले, माजी नगरसेवक आर.डी.पाटील, अशोक देसाई, तुषार देसाई, सुनील जाधव, अमर समर्थ, आझम जमादार, विशाल देवकुळे, अश्विन शेळके, अमित चव्हाण, युवा सेनेचे योगेश चौगुले, अविनाश कामते, प्रशांत जगदाळे, राज भोरी, महिला आघाडीच्या सौ.पूजा भोर, सौ. पूजा कामते, सौ.मंगल कुलकर्णी, कु.रुपाली कवाळे आदी शिवसेना भाजप युतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
*प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ रविवार दि.०७ एप्रिल २०१९ रोजी रंकाळावेश स्टँड परिसरात प्रचार फेरी*
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाई, रा.स.पक्ष युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ उद्या कोल्हापूर शहरात उद्या रविवार दि. ०७ एप्रिल २०१९ रोजी सकाळी रंकाळावेश स्टँड परिसरात प्रचार फेरी काढण्यात येणार आहे. प्रचार फेरीची सुरवात रंकाळा टॉवर येथून करण्यात येणार आहे. ही फेरी पुढे रंकाळावेश स्टँड मार्गे गंगावेश चौक अशी काढणेत येणार आहे.
Leave a Reply