
कोल्हापूर : क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारे वादन, ढोल –ताशांच्या आवाजात जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, गणपती बाप्पा मोरयाचा गजर करीत हिंदू नववर्ष गुडीपाडवयाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन आणि युवासेना कोल्हापूर शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “वाजवेल तो गाजवेल” या ढोल ताशा वादनाच्या कार्यक्रमामध्ये एकापेक्षा एक सरस पथकांनी आपले कौशल्य पणाला लावले. यातील सहभागी पथकांना व वादकांना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मेडल्स आणि मानाची ढाल देवून गौरविण्यात आले.
गत दोन वर्षापासून गुडीपाडव्याच्या निमित्ताने युवासेनेच्या वतीने “वाजवेल ते गाजवेल” या ढोल – ताशा वादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी प्रमाणे सलग तिसऱ्या वर्षी या ढोल – ताशा वादनाचे आयोजन करण्यात आले होते. सहा पथकांतील कलाकारांनी विविध कलाविष्कार सादर करून करवीरकरांची माने जिंकली. त्यांना टाळ्या, शिट्यानी रसिकांनी भरभरून दाद दिली.
या स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज याना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, देशामध्ये अनेक ठिकाणी पाश्च्यात्य संस्कृतीचे अनुकरण करून १ जानेवारी रोजी नशेच्या धुंदीत नववर्ष साजरे केले जाते. परंतु हिंदू तिथी प्रमाणे येणाऱ्या गुढीपाडव्यासह मंगलमय हिंदू सणांकडे पाठ फिरविली जात आहे. या मंगलमय दिवसाचे मंगलमय स्वागत करून समस्त हिंदू जणांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या दृष्टीने आणि हिंदू सणांचे महत्व हिंदू जणांपर्यंत पोहचविण्याकरिता युवसेना कोल्हापूर आणि आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन यांच्या माध्यमातून गतवर्षीपासून हा एक आगळा – वेगळा उपक्रम राबविण्यात येत असून, हि बाब अभिमानास्पद असल्याचे सांगत डॉल्बी ला फाटा म्हणून ढोल- ताशा पथकांची दिवसेंदिवस वाढत चाललेली मागणी सकारात्मक असल्याचे सांगितले.
ता स्पर्धेत जिल्ह्यातून सहा संघांनी आपला सहभाग नोदविला होता. प्रारंभी सहभागी झालेल्या स्पर्धकांना स्पर्धेची नियमावली सांगण्यात आली. ढोल – ताशा सादरीकरण करण्याचा पहिला मान गतविजेत्या सिद्धेश्वर ढोल – ताशा पथकाला देण्यात आला. प्रत्तेक पथकाला सादरीकरणासाठी २० मिनिटांचा वेळ देण्यात आला.
या स्पर्धेत सिद्धेश्वर ढोल ताशा पथक, जयसिंगपूर, रुद्र्तांडव ढोल ताशा पथक, पट्टणकोडोली, आम्ही कोल्हापुरी ढोल ताशा पथक, कोल्हापूर, रणांगण ढोल ताशा पथक, कोल्हापूर, करवीर गर्जना ढोल तशा पथक, कोल्हापूर, स्वराज्य ढोल ताशा पथक, कोल्हापूर या पथकांनी सहभाग घेतला.
यावेळी देवस्थान समिती कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले, युवासेनेचे ऋतुराज राजेश क्षीरसागर, पुष्कराज राजेश क्षीरसागर, शिवसेनेचे जयवंत हारुगले, महिला आघाडीच्या शहर संघटक सौ. मंगल साळोखे युवा सेना जिल्हा समन्वयक योगेश चौगुले, जिल्हा चिटणीस अविनाश कामते, शहर समन्वयक शैलेश साळोखे, शहरप्रमुख पियुष चव्हाण, विश्वदिप साळोखे, शहर सरचिटणीस शरद चौगुले, आय.टि.सेना शहरप्रमुख सौरभ कुलकर्णी, उपशहरप्रमुख अक्षय कुंभार, शिवतेज सावंत, उद्धव पडवळे, अक्षय पाटिल, विश्वजीत चव्हाण, दादु शिंदे, अक्षय बोडके, आफान बागवान, शुभम ठोंबरे, आदी रुग्णाचे नातेवाईक आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply