
कोल्हापूर : भारतासारख्या विकसनशील देशामध्ये ६५ वर्षे सत्ता भोगून देशवासियांना देशोधडीला लावणाऱ्या कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारने केलेल्या घोटाळ्यांमुळे सकारात्मक परिस्थिती असतानाही देशाचा हवा तसा विकास झाला नाही. परंतु यापूर्वीच्या शिवसेना – भाजप युतीच्या काळात शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान मा.अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या. त्याच पद्धतीने सध्याच्या युती सरकारमध्ये पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लोकहिताच्या कामासह देशाच्या उन्नती साठी आवश्यक असलेले प्रकल्प व योजना अंमलात आणल्या गेल्या. त्यामुळे देशामध्ये युतीचे शासन येणे काळाची गरज आहे. यासह कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रा.संजय मंडलिक यांना विजयी करा, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. शिवसेना भाजप रिपाई रासप युतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ रंकाळा टॉवर – गंगावेश परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली.
Leave a Reply