
हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक व विठ्ठलाई देवीचे जागृत देवस्थान
कोल्हापूर : मार्केट यार्ड येथील विठ्ठलाई देवीचे जागृत देवस्थान आहे. भाविक येथे मोठ्या श्रद्धेने येत असतात. या ठिकाणी एका वास्तूत विठ्ठलाई देवी बरोबर वैष्णवी देवी, स्वामी समर्थ आणि हजरत पीर गैबी साहेब यांचा दर्गा आहे. हिंदु-मुस्लीम सर्व भाविक मोठ्या संख्येने येत असतात. या मंदिराची सेवा पोलादे कुटुंबियांच्याकडून मनोभावे केली जात असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात भजन-कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. येथील श्रद्धास्थान पाहून यावर्षीच्या कार्यक्रमाला अनेक सेलिब्रेटीही मनोभावे हजेरी लावली होती.
४५ वर्षापूर्वी कै. माताजी यांनी मंदिराची स्थापना केली होती. मंदिर आणि वृद्ध लोकांना त्या सांभाळत होत्या त्यामुळे याला अश्रू मंदिर असेही नामकरण केले होते. येथे आल्यानंतर सर्व प्रसन्न वातावरणात देवांचे दर्शन होवून मन:शांती मिळत असल्याची लोकांची भवना आहे. यामुळेच भाविकांचा श्रद्धेनेच हे मंदिर आज जागृत झाले देवस्थान म्हणून प्रसिद्ध झाले आहे. धनंजय पोलादे व त्यांच्या कुटुंबीय याची सेवा करत असून त्यांनी लताई रोटी बँक या संस्थेची स्थापना केली असून दर वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील गरीब आणि भुकेलेल्या लोकांना अन्न पोहोचवण्याचे कार्य सातत्याने केले जात असल्याचेही धनंजय पोलादे यांनी सांगितले.
Leave a Reply