
कोल्हापूर : रोजच्या व्यापामुळे इच्छा असूनही जेष्ठ लोकांच्या सेवेसाठी वेळेत कुणी मिळत नाही तसेच घरच्या घरी देखील योग्य पद्धतीने काळजी कशी घ्यावी हे देखील माहिती नसते. यासाठी वाढती लोकसंख्या आणि काळजी गरज ओळखून कोल्हापूरातील त्रुनानुबंध ट्रस्ट आणि जेरीयाट्रिक सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने घरातील जेष्ठ, वृद्ध आणि रुग्णांची काळजी घेण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून सर्टिफिकेट कोर्स इन डिसेबल्ड सीनियर सिटीजन केअर हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. लिहिता वाचता येणाऱ्या कोणीही व्यक्तींनी हा कोर्स पूर्ण करून अर्थाजन संधीही घ्यावी असे नीलिमा पाटील आणि स्वरूपा कोरगावकर यांनी सांगितले.
कोल्हापूरातील त्रुनानुबंध ट्रस्ट आणि जेरीयाट्रिक सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने घरातील जेष्ठ, वृद्ध आणि रुग्णांची काळजी घेण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. सध्या ज्येष्ठांची वाढती लोकसंख्या वाढते आजार परिवारांमध्ये हे सर्वांनाच नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर पडावे लागत असल्याने ज्येष्ठांची सेवा करण्यासाठी घरात कोणीच नसते वृद्धाश्रम किंवा हॉस्पिटलमध्ये नेऊन ऍडमिट करण्याची अनेक मुलांना इच्छा नसते आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींवर घरच्या घरी चांगले उपचार व्हावेत त्यांची सुशृषा उत्तम पद्धतीने केली जावी अशी घरातल्यांची इच्छा असते ही बाब लक्षात घेऊन ऋणानुबंध ट्रस्टच्यावतीने सर्टिफिकेट कोर्स इन डिसेबल्ड सीनियर सिटीजन केअर हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे तीन महिन्याचा कालावधी असणाऱ्या या कोर्समध्ये ज्येष्ठ मधील एकाकीपणा कसा दूर करावा न्यूनगंड नाही मानसिकता नैराश्य परावलंबी जीवन अकार्यक्षमता सतत आजारी असणे डायबिटीस ब्लड प्रेशर पॅरालिसीस यासारखे आजारांमुळे परावलंबी झालेल्या ज्येष्ठांची सेवा कशी करावी त्यांना आहार कसा द्यावा मसाज कसा करावा त्यांच्याकडून व्यवसाय कसा करून घ्यावा अंथरुणावर खिळून असलेल्या रुग्णांना जखम होणार नाही याची काळजी कशी घ्यावी याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जाणार आहे तसेच प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये पंधरा दिवसाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे अशाप्रकारे हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्यक्तींना सेवेबरोबरच अर्थार्जनाची संधी ही ही उपलब्ध होणार आहे 20 एप्रिल पासून या अभ्यासक्रम शाहूपुरी येथील तिसऱ्या गल्लीतील लक्ष्मी विष्णू होमिओपॅथिक हॉस्पिटल सांज निवारा येथे सुरू होणार आहे लिहिता वाचता येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी या कोर्सला प्रवेश मिळणार आहे अशी माहिती नीलिमा पाटील आणि स्वरूपा कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. विश्वनाथ मगदूम, डॉ. महावीर मिठारी, डॉ. रामानंद दगडे, लक्ष्मी कोरगावकर आदी उपस्थित होते.
I am 61 now looking for female caretaker for travelling, cooking etc.’ll help me