कोल्हापूर : आपल्या घासातील घास दुसऱ्यांना द्यावा अशी आपली संस्कृती आहे. हीच परंपरा जोपासत गेली अठरा वर्षे सलग श्री जोतीबा भक्तांसाठी अन्नछत्राचा रूपाने सहजसेवा ट्रस्ट जोपासत आहे यंदाच्या 19 वर्षी जोतीबा यात्रेकरूंसाठी अन्नछत्रांची तयारी सुरू आहे. भाविक मोठ्या संख्येने अन्नछत्रचा याचा लाभ घेतात. यंदाही १७ एप्रिल ते 23 एप्रिल अखेर अन्नछत्राचा उपक्रम ज्योतिबा डोंगरावरील गायमुख येथे ते रात्रंदिवस राबविला जाणार आहे तसेच या उपक्रमासाठी ज्या व्यक्तींना मदत करायची आहे हे त्यांनी देखील ट्रस्टशी संपर्क साधावा असे आवाहन संमती मिरजे व त्यांच्या सहकार्यांनी यांनी केले आहे
श्री जोतीबा यात्रा 19 एप्रिल रोजी भरत असून कर्नाटक आंध्र महाराष्ट्र अशा राज्यातून पाच ते सहा लाखांच्या दरम्यान यात्रेकरू यात्रेसाठी येत असतात महाराष्ट्रातील प्रमुख यात्रेपैकी की ही एक यात्रा असते. मुख्य यात्रा शुक्रवारी असून या काळात साधारण दोन लाख भाविक अन्नछत्राचा लाभ घेतील अशी अपेक्षा आहे. गेली १८ वर्षे अन्नछत्राची परंपरा सहजसेवा ट्रस्ट मोठ्या भक्तीभावाने जोपासत आहे. आजपर्यंत 25लाखांपेक्षा जास्त लोकांनी याचा लाभ घेतला आहे यंदाही 17 एप्रिल ते 23 एप्रिल अखेर हा अन्नछत्राचा उपक्रम जोतिबा गायमुख येथे रात्रंदिवस राबवला जाणार आहे.
यात्रेकरूंची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही ही याची दक्षता घेऊन पुर्वतयारी जोमाने सुरू आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही अन्नछत्र साठी ही आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या मिळालेले आहेत. शासनातर्फे आरोग्य सेवा केंद्रही उभारण्यात येत आहे या उपक्रमासाठी आवश्यक असणारा मंडप काटे डेकोरेटर्स चे मालक अनिल काठे यांनी 15 हजार चौरस फुटाचा मांडव घालून दिला आहे. अंघोळीसाठी बाथरूम ची सोय पार्किंगची सोय चहा व मट्टा यासाठी स्वतंत्र मंडप अशी तयारी झाली आहे. बैलगाड्या घेऊन येणाऱ्यांसाठी बैलासाठी दोन हजार किलो भुस्सा पिशवीत भरण्याचे कामही चालू आहे. उन्हाचा तडाका असल्याने पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली आहे. याच बरोबर दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर आयोजित केले असून वातानुकूलित व्होल्वो बस सोय केली आहे. अशा सर्व व्यापक पद्धतीने सहज सेवा ट्रस्ट चे कार्य सुरू आहे या सर्व उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने ज्या व्यक्तींना मदत करायची आहे त्यांनी ट्रस्ट शी संपर्क साधावा असे आवाहन संमती मिरजे व व त्यांच्या सहकार्या यांच्याकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply