
कोल्हापूर : कोल्हापूरचा खासदार हा शिवसेनेचा व्हावा हे खुद्द शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे नाते होते. यासह आई अंबाबाईवर त्यांची श्रद्धा होती. ते नेहमी आपल्या दौऱ्यांना, प्रचाराना आई अंबाबाईच्या दर्शनाने सुरवात करायचे. लोकसभा निवडणुकीसाठी युतीच्या प्रचाराची सुरवातही आई अंबाबाईच्या दर्शनाने कोल्हापुरातून झाली असून, हा सुवर्णयोग प्रा. संजय मंडलिक यांना खासदार करण्यासाठी जुळून आला आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी समस्त शिवसैनिकांनी यंदाचा निर्धार, शिवसेनेचा खासदार हे सूत्र हाती घेतले असल्याचे प्रतिपादन आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला. शिवसेना भाजप रिपाई रासप युतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सदर बझार कदमवाडी परिसरात आयोजित प्रचार फेरी प्रसंगी ते बोलत होते.
आज सकाळी प्रचार फेरीची सुरवात सदर बझार चौक येथून आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, यशवर्धन मंडलिक यांनी केली. यावेळी “जय भवानी जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद” अशा घोषणा देत प्रचार फेरी परिसर दणाणून सोडला. यासह प्रा.संजय मंडलिक यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. पुढे ही प्रचार फेरी पुढे शाहू कॉलेज – विचारे माळ – डी. वाय. पाटील कॉलेज मार्गे कदमवाडी चौक येथे येवून समाप्त करण्यात आली.
या प्रचार फेरी प्रसंगी दीपक गौड, उपशहरप्रमुख राहुल चव्हाण, अरविंद मेढे, रघुनाथ टिपुगडे, रमेश खाडे, दीपक चव्हाण, रणजीत जाधव, राजू पाटील, शाम जाधव, सनी अतिग्रे, गजानन भुर्के, प्रशांत जगदाळे, राज भोरी, मुकुंद मोकाशी, संदीप पोवार आदी शिवसेना भाजप युतीचे पदाधिकारी व भागातील महिला उपस्थित होत्या.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाई, रा.स.पक्ष युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ उद्या कोल्हापूर शहरात उद्या शुक्रवार दि.१२ एप्रिल २०१९ रोजी सकाळी बिंदू चौक गुजरी परिसरात प्रचार फेरी काढण्यात येणार आहे. प्रचार फेरीची सुरवात छत्रपती शिवाजी चौक – बिंदू चौक – जेल रोड – गुजरी – महाद्वार रोड – ताराबाई रोड- मित्रप्रेम – बाबूजमाल दर्गा – जैन मंदिर – पापाची तिकटी – चप्पल लाईन – छत्रपती शिवाजी चौक येथे समाप्त येथे समाप्त अशी काढणेत येणार आहे.
यासह सायंकाळी चार स्टेज सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. सायं. ६.०० वाजता सिद्धार्थनगर कमान सायं.७.०० वाजता विचारेमाळ चौक, रात्री ८.०० वाजता भोसलेवाडी चौक, रात्री ९.०० वाजता लाईन बझार चौक येथे आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली स्टेज सभा घेण्यात येणार आहे.
Leave a Reply