
कोल्हापूर : विकासाच्या गप्पा गोष्टी करणारे विद्यमान खासदार प्रश्न मांडल्याचे सांगत आहेत. पण कोल्हापूर जिल्ह्यात झालेली विकास कामे ही शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातूनच झाली आहेत. लोकप्रतिनिधी या नात्याने हे त्यांचे कामच होते पण मांडलेल्या प्रश्नातून किती प्रश्नाची सोडवणूक झाली, हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. ठराविक सांस्कृतिक कार्यक्रम, मतदारांना आमिषे आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा अपप्रचार याशिवाय प्रचाराचे मुद्दे विद्यमान खासदारांकडे नाहीत. याउलट शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे प्रश्नाची सोडवणूक करण्याची असलेली कसब आणि गेल्या साडेचार वर्षात शिवसेना भाजप युतीने उभा केलेला विकास कामांचा डोंगर, सर्वसामान्य जनतेशी असलेला संपर्क, यामुळे कोल्हापुरात भगवाच फडकणार असून, प्रा. संजय मंडलिक यांचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला. शिवसेना भाजप रिपाई रासप युतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ बिंदू चौक – गुजरी परिसरात आयोजित प्रचार फेरी प्रसंगी ते बोलत होते.
आज सकाळी प्रचार फेरीची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केली. यावेळी “जय भवानी जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद” अशा घोषणा देत प्रचार फेरी परिसर दणाणून सोडला. यासह प्रा.संजय मंडलिक यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. पुढे ही प्रचार फेरी पुढे बिंदू चौक – सबजेल रोड – गुजरी – बाबूजमाल दर्गा – जैन मंदिर रोड – पापाची तिकटी – चप्पल लाईन – गंजी गल्ली येथे येवून समाप्त करण्यात आली.
यावेळी बोलतना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, गेल्या साडेचार वर्षात युती शासनाने केलेल्या विकास कामाच्या शिदोरीवर आम्ही मतदारांपर्यंत पोहचत आहे. याउलट विकासाच्या गोष्टी करणाऱ्यांना मतदारांना आमिषे दाखवत सामोरे जावे लागत आहे. हाच शिवसेना भाजप युती आणि भ्रष्ट राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस आघाडी मधला फरक आहे. विविध शासकीय योजना राबवत युती शासनाने सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे युती शासनास पाठबळ देवून गल्ली ते दिल्ली पर्यंत भगवा फडकविण्यासाठी महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचे धनुष्यबाण चिन्ह घराघरात पोहचवून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रचार फेरी प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, शिवसेना उपशहरप्रमुख अमित चव्हाण, दीपक चव्हाण, तुकाराम साळोखे, अजित गायकवाड, कपिल केसरकर, प्रकाश ओसवाल, बाळू ओसवाल, अंकुश निपाणीकर, निहाल मुजावर, सागर शिंदे, शाहरुख बागवान, विकी भुर्के, केदार भुर्के, मोहन माजगावकर, युवराज भोसले, अभिजित ओतारी, निखील कालेकर, अवधूत दळवी, विक्रम पवार, उदय शिंदे, निशांत वाकडे, गोविंद वैदू आदी शिवसेना भाजप युतीचे पदाधिकारी व भागातील नागरिक उपस्थित होते.
Leave a Reply