13 एप्रील रोजी कोल्हापूरात आदित्य ठाकरे साधणार तरुणांशी संवाद

 

कोल्हापूर : महाराष्ट्रातील तरुण युवा वर्गाच्या आपेक्षा जाणून घेण्यासाठी शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शनिवार 13 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता पेटाळा मैदान न्यु महाद्वार रोड येथे “आदित्य संवाद” या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूरच्या युवक युवतीसाठी थेट संवाद साधणार आहेत. “आदित्य संवाद” हा एक अद्वीतीय कार्यक्रम असून या माध्यमातून सर्वात मोठी सृजनशील शक्ती असणाऱ्या युवकांच्या समश्या व विचारासाठी हे व्यासपिठ उपलब्ध असणार आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्यात आदित्य ठाकरे हे डीजीटल माध्यमातून किमान 15 लाख युवकांशी संवाद साधणार आहेत.
सदरचा कार्यक्रम 18 ते 35 वयोगटातील युवा वर्गासाठी खुला आहे. या कार्यक्रमासाठी युवक युवती www.aditysanvad.com या संकेतस्थळावर नोंदणी करुन कार्यक्रमास उपस्थित राहू शकतात. तसेच आगामी काळातही या कार्यक्रमाद्वारे प्रत्येक्ष व आँनलाईन संपर्कात आलेला युवा वर्ग आदित्य ठाकरे यांच्याशी कनेक्ट राहू शकतो. यासह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील काँमर्स, आर्टस्, सायन्स, इंजिनिअरींग, मेडीकल, सांस्कृतीक, कला क्रिडा, पाँलिटेक्नीक, कृषी उद्योजक, प्रयोगशिल संशोधक अशा विविध क्षेत्रातील युव युवतींनाही सहभागी होता येणार आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाली आहे. युवा सेनेने जिल्ह्यातील बारा तालुक्यातील विविध महाविद्यालयात जाऊन या “आदित्य संवाद” कार्यक्रमासाठी युवकांची नोंद केली आहे. आज अखेर 60 हजार युवक युवतींची आँनलाईन सोशल मिडीया आणि प्रत्येक्ष नोंदणी पूर्ण झाली आहे.
या कार्यक्रमाच्या ठिकाणी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे व्हीजीटींग कार्ड ही युवक युवतींना देणेत येणार असून त्याद्वारे ते नेहमी त्यांच्याशी संवाद साधू शकतात. हा पहिला टप्पा असून आगामी वर्षात आदित्य ठाकरे अशा प्रकारे डिजीटल आणि प्रत्येक्ष माध्यमातून महाराष्ट्रातील युवा वर्गाशी संवाद साधणार आहेत. तरी अधिकाधिक युवक युवतींनी www.aditysanvad.com या संकेतस्थळावर नोंदणी करुन तसेच थेट कार्यक्रमास येऊन सहभागी व्हावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा युवा सेनेच्या वतीने करणेत आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!