आ.सतेज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

 

कोल्हापूर: आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांसह जेष्ठ नागरिक आणि महिलांनी आमदार सतेज पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शुभेच्छाच्या स्वरूपात नागरिकांनी वह्यांचा वर्षाव केला.आमदार सतेज पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आणि न्यायाची भूमिका स्वीकारून आपल्या वाढदिवसादिवशी शुभेच्छाच्या स्वरूपात कोणत्याही प्रकारचे हार किंवा पुष्पगुच्छ न स्वीकारता वह्या स्वीकारण्याचे आवाहन २००७ साली केले होते. या आवाहनाला समाजातील सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसा निमित्य समाजातील सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील नागरिकांनी त्यांना वह्या भेट देऊन शुभेच्छा दिल्या. आज सकाळी आठ वाजल्यापासून आमदार सतेज पाटील यांच्या कसबा बावाड्यातील निवासस्थानी त्यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांसह नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, वैजयंती संजय पाटील, सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील, डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील, पूजा ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील निशांत पाटील सुशांत पाटील यांनीही आमदार सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच फोनवरून शुभेच्छा दिल्या.डॉ डी वाय पाटील दादा माजी राज्यपाल ( त्रिपुरा बिहार ) सुशिलकुमार शिंदे ( माजी (केंद्रीयमंत्री )अशोकराव चव्हाण ( प्रदेशाध्यक्ष ) पृथ्वीराज चव्हाण त्माजी मुख्यमंत्री ) खासदार संभाजीराजे छत्रपती , सुभाष देसाई उद्योग मंत्री, खा राजू शेट्टी आमदार बाळासाहेब थोरात, डी पी सावंत, राजेश क्षीरसागर, हर्षवर्धन पाटील , पाशा पटेल ,शिवेंद्रराजे भोसले ,जयकुमार गोरे ,आनंदराव पाटील नाना ,जयवंतराव आवळे, उल्हास दादा पवार, पृथ्वीराज पाटील ( सांगली ) सत्यजीत देशमुख , कोल्हापूर शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, प्रवक्ते सतीश सावंत, राजू वाघमारे (प्रदेश सरचिटणीस ) बुधाजीराव मुळीक कल्लाप्पांना आवाडे, संजय घोडावत , ( उद्योगपती ), संपतबापू पाटील, राजेश नरसिंगराव पाटील, गणपतराव पाटील, पी एम पाटील, जालंदर पाटील,आदि मान्यवरांनी आमदार सतेज पाटील यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजीमंत्री प्रकाश आवाडे माजी आमदार पी एन पाटील, प्रकाश आबीटकर, महापौर सरिता मोरे, सुरेश साळोखे ( मा आमदार ) उपमहापौर भूपाल शेटे, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, राहुल आवाडे संग्रामसिंह कुपेकर, दुर्गेश लिंग्रस यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा संजय मंडलिक यांनीही आमदार सतेज पाटील यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रा संजय मंडलिक आणि आमदार सतेज पाटील यांना उचलून घेऊन जल्लोष केला. जयराम पाटील (नगराध्यक्ष ) नामदेवराव मेंडके, (मुरगुडचे उपनगराध्यक्ष ) बाळासाहेब खाडे, प्रकाश मोरे, राहुल खंजिरे, प्रकाश सातपुते विजयसिंह मोरे, बाळासाहेब सरनाईक, गुलाबराव घोरपडे, सर्जेराव पाटील पेरीडकर, बाळासाहेब कुपेकर, जयवंतराव शिंपी, संजय शेटे, प्रदीपभाई कापडिया, सदाशिव चरापले, सरलाताई पाटील, अंजनाताई रेडेकर, आनंद माने, राजेश लाटकर, विरेंद्र मंडलीक, विजयसिंह जाधव (बापू ),प्रताप कोंडेकर, राजीव पारीख जयंत आसगावंकर, संध्या घोटणे यांच्यासह मान्यवरांनी आमदार सतेज पाटील यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी युवा कार्यकर्त्यांची उपस्थिती ही लक्षणीय होती.
आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील अनेक घटकांमधून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. कोल्हापूर महापालिकेच्या काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी त्यांच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त ४७ हजार वह्या भेट देत शुभेच्छा दिल्या. त्यांच्या वाढदिवसाला सर्वच थरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार सतेज पाटील हे नेहमीच्या समाजातील गरजू वंचित घटकांना विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मदतीचा हात देतात. समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याची भूमिका स्वीकारून ते कार्यरत असतात. दिव्यांग बांधवांना नेहमीच आधार देणाऱ्या यांच्या कार्याबद्दल प्रहार संघटनेच्या दिव्यांग बांधवांनी त्यांच्या घरी येऊन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. पाटील यांनी या दिव्यांग बांधवांबरोबर केक कापुन आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी राज उबारे परिवाराने ही ज्ञानमय जीवन ज्योत सतेजोमय राहो अशा शब्दात आमदार सतेज  पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कला, क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवारांनीही यावेळी आ. पाटील यांना शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्र राज्यमान्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीने आमदार सतेज हे आपल्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणाला चालना देण्याचं महत्वपूर्ण कार्य करणारा ध्येयवादी नेता असून त्यांचा हा उपक्रम नक्कीच बहुजन समाजाला प्रेरणा देणारी आहे अशा शब्दत यांचे कौतुक केले.
वाढदिवसानिमित्त नगरसेवक, नगरसेविका, विविध गावाचे सरपंच , समाजातील कला क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि औदयोगिक क्षेत्रासह इतर क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छाच्या स्वरूपात वह्यांचा वर्षाव केला. आज विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसाला शुभेच्छाच्या स्वरूपात वह्या भेट देऊन शुभेच्छाचा वर्षाव केला. वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!