

कोणतीही निवडणूक असो, कारण नसताना खोटे-नाटे आरोप होत असतात. पण निवडणूक विकासाच्या मुद्दयावर आणि उमेदवाराच्या क्षमतेवर व्हावी, असे माझे मत आहे. उमेदवाराची कार्यक्षमता, त्यांचे व्हीजन, काम करण्याची पध्दत काय असते, हे जनतेला माहित असते. त्यामुळेच या निवडणूकीत मी आत्मविश्वासाने जनतेसमोर आलो आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी ८ हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. अशा वेळी जनतेने कोणत्याही भूलथापांना बळी न पडता सहकार्य करावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील चुये, वडकशिवाले आणि खेबवडे येथे महिला आणि नागरिकांनी खासदार महाडिक यांचे जल्लोषात स्वागत करून, पाठिंबा व्यक्त केला. रणरणत्या उन्हातही शेकडो नागरिक उत्स्फूर्तपणे खासदार महाडिक यांच्यासोबत फिरत होते.
लोकसभा निवडणुकीचे मतदान २३ एप्रिलला होणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील चुये, वडकशिवाले आणि खेबवडे या गावांना भेटी दिल्या. वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी सुवासिनींनी खासदार महाडिक यांचे औक्षण केले. प्रत्येक गावांतून पदयात्रा काढून, खासदार महाडिक यांनी जनतेशी संवाद साधला. गेल्या पाच वर्षात केलेले काम हीच माझी ओळख आणि शिदोरी आहे, असे खासदार महाडिक म्हणाले. विमानतळ, रस्ते, रेल्वे प्रकल्प, बास्केट ब्रिज, पेयजल योजना, बीएसएनएलचे टॉवर्स अशा विविध विकासकामांसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ८ हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. कोणत्याही निवडणूकीत विकासाचा मुद्दा महत्वाचा ठेवून मतदान होणे आवश्यक आहे. खोटे- नाटे आरोप करून मतदारांची दिशाभूल करणार्या प्रवृत्तीलाच हद्दपार करावे. गेल्या पाच वर्षात जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. तर बास्केट ब्रीज, विमानतळाची नवी इमारत यासारखे प्रकल्प दुरगामी विकासाचे असून, त्याच्या पुर्ततेसाठी पुन्हा साथ द्यावी, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. सौ. अरुंधती महाडिक यांनी आजवर ३५ ते ४० हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन स्वावलंबी बनवले आहेत. मात्र, विरोधकांकडून नाहक टीका केली जात आहे. मी माझ्या केलेल्या कामाच्या शिदोरीवरच तुमचा आशीर्वाद मागत आहे. त्यामुळे विरोधकांच्या टिकेला भिक घालू नका, असे खासदार महाडिक यांनी नमूद केले. कोल्हापूर दक्षिण ही माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे हक्काने तुमच्याकडे मतदान मागत असून, या पुढेही माझ्या कर्मभूमीचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्यांचे त्यांनी स्पष्ट केले. चुये इथल्या सभेवेळी शेतकरी संघाचे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, केडर संचालक पांडुरंग मगदूम, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र मगदूम, रणजित पाटील, सचिन माने, विजय मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच कविता साहेकर, गोकुळच्या संचालिका श्रीमती जयश्री आनंदराव पाटील-चुयेकर, पाणीपुरवठा संस्थेचे संचालक तुकाराम राजिगरे, हिंदुराव राजिगरे, पोपट बेडगे, संजय पाटील, आर. एन. पाटील, रणजित मगदूम, महेश मगदूम, रंगराव मगदूम, आनंदा राऊत, प्रदीप पाटील, लखन पाटील, तेजस मगदूम, रंगराव तोरस्कर, साताप्पा मगदूम युवराज तिबिले, संजय व्हनाळकर, महेश मगदूम, प्रकाश देवकुळे, हिंदुराव मगदूम उपस्थित होते.
Leave a Reply