
कोल्हापूर : गेल्या वर्षी बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या कोल्हापुरातील मलाबार गोल्ड अँड डायमंडस या शोरूमचा पहिला वर्धापन दिन गुरुवारी छत्रपती मालोजीराजे यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी स्टोअर हेड शाहीन परवाज, असिस्टंट स्टोअर हेड आबिद आणि स्टोअर मॅनेजर आशिष महागावकर यांच्यासह ग्राहक उपस्थित होते.यावेळी बोलताना मालोजीराजे म्हणाले की, कोल्हापुरात बाहेरून विविध व्यावसायिक आपला व्यावसाय घेऊन येत आहेत,याचं कारण कोल्हापूरचे लोक खूप विश्वासू आहेत.त्यांना जे पसंद पडेल त्यावर व्यावसायिकाचा कस लागतो,त्यामुळेच मलाबार गोल्ड अँड डायमंडस सारख्या मोठ्या ज्वेलर्स ना कोल्हापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.हा विश्वास अखंड रहावा यासाठी येथील व्यावस्थापणाने बांधील रहावे असेही त्यांनी सांगितले.त्याचबरोबर मलाबार गोल्डने यावर्षीपासून आपल्या नफ्यातून तब्बल दहा लाख रुपये आर्थिक दुर्बल घटकांतील मुलींच्या उच्च शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार असल्याची घोषणा मालोजीराजे यांच्या वतीने करण्यात आली.तसेच पहिल्या वर्धापनदिना निमित्ताने 11 ते 15 एप्रिलपर्यंत 40 हजार रुपयांच्या सोन्याच्या खरेदीवर एक सोन्याचे नाणे ग्राहकांना भेट दिले जाणार असल्याचे असिस्टंट स्टोअर हेड आबिद व्हिटी यांनी सांगितले.
Leave a Reply