
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मॅकॅनिक्स असोसिएशनच्या वतीने जोतिबा यात्रेंसाठी येणार्या भक्तांच्या वाहनांची मोफत दुरुस्ती व पंक्चर झालेल्या गाडींचे पंक्चर काढणे हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यंदाचे हे 19 वे वर्ष असून या सेवेची सुरुवात बुधवार (दि.17) पासून यात्रा संपेपर्यंत राहणार असल्याची माहिती सेवा कमिटी प्रमुख संजय पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ही सेवा यात्री निवास येथील टू व्हीलर पार्कींग, यमाई मंदीर, नवीन टू व्हीलर पार्किंग स्थळ आदी ठिकाणी राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर घाटामध्ये 8 ते 10 अशा विविध ठिकाणी सेवा कक्ष उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर भाविकाला जागेवर सेवा देण्यासाठी ठिकठिकाणी घाटामध्ये संपर्क नंबर असणारे बोर्ड लावण्यात येणार आहेत. ही सेवा पार पाडण्यासाठी कोल्हापूर जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक असोसिएशनचे 80 ते 100 मेकॅनिक बांधव या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
यावर्षीपासून सेवेत विशेष उपक्रम म्हणून मॅकेनिक गृहिणींचाही समावेश असणार आहे. पत्रकार परिषदेला नाना गवळी, माधव सांवंत, बबन सावंत, रवि कांडेकरी, वैभव पाटणकर उपस्थित होते.
Leave a Reply