
कोल्हापूर : कोल्हापूर शहराचा मुळचा पेठांचा भाग कायम शिवसेनेच्या मागे उभा आहे. पेठांमधील स्वाभिमानी जनता काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे उभी आहे. नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणारा कार्यकर्ता म्हणजेच युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक असून, मंगळवार पेठेतील या प्रचार फेरीने उठलेले भगव वादळ प्रा. संजय मंडलिक यांच्या विजयाची नांदी आहे, असे प्रतिपादन आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला. शिवसेना भाजप रिपाई रासप युतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मंगळवार पेठ परिसरात आयोजित प्रचार फेरी प्रसंगी ते बोलत होते.
आज सकाळी प्रचार फेरीची सुरवात श्री शेषनारायण मंदिर मंगळवार पेठ येथे दर्शन घेवून आमदार राजेश क्षीरसागर, प्रा. संजय मंडलिक, देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी केली. यावेळी “जय भवानी जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद” अशा घोषणा देत प्रचार फेरी परिसर दणाणून सोडला. यासह प्रा.संजय मंडलिक यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. पुढे ही प्रचार फेरी पुढे प्रिन्स क्लब, खासबाग रिक्षा स्टॉप, पाटाकडील तालीम, देवणे गल्ली, मंडलिक गल्ली, सुबराव गवळी तालीम, माने गल्ली, राम गल्ली, शाहू बँक रोड, नंगीवली तालीम, लाड चौक, पद्माराजे शाळा, सणगर गल्ली, कोळेकर तिकटी मार्गे मिरजकर तिकटी येथे येवून समाप्त करण्यात आली.
यावेळी बोलतना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, देशास स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत पैशाच्या बळावर केंद्रात आणि राज्यातील सत्ता हस्तगत करून भ्रष्टाचार, घोटाळे याद्वारे जनतेची फसवणूक करून देशाला लुबाडणाऱ्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारला गत लोकसभा निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत नेस्तनाभूत करून देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी कोल्हापुरातून प्रा. संजय मंडलिक यांना विजय करावे, असे आवाहनही आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
या प्रचार फेरीस माजी आमदार सुरेश साळोखे, नगरसेवक संभाजी जाधव, नगरसेवक विजय सूर्यवंशी, नगरसेवक विजय खाडे, दीपक गौड, जयवंत हारुगले, राजू पाटील, गजानन भुर्के, रणजीत मंडलिक, माजी नगरसेवक आर. डी.पाटील, अशोकराव पोवार, रमेश मोरे, श्रीकांत माने, माणिकराव मंडलिक, मदन चोडणकर, रवी आवळे, संदीप सरनाईक, कुणाल शिंदे, संतोष माळी, तारक सुतार, रणजीत सासणे, संदीप पोवार, प्रमोद पाटील, दिनेश साळोखे, सोनू लाड, बाळासाहेब पोवार, अमर भोसले, मनोज आपटे, सुभाष माळी, शिवाजी पंडे, अमित गवळी आदी शिवसेना भाजप युतीचे पदाधिकारी, मंडलिक प्रेमी, मंगळवार पेठेतील तालीम संस्था व मंडळांचे पदाधिकारी व भागातील नागरिक उपस्थित होते.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाई, रा.स.पक्ष युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर शहरात उद्या गुरुवार दि.१८ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता मंगळवार पेठ परिसरात प्रचार फेरी काढण्यात येणार आहे. प्रचार फेरीची सुरवात उभा मारुती चौक येथून करण्यात आली. हि फेरी पुढे साकोली कॉर्नर, तटाकडील तालीम, निवृत्ती चौक, गांधी मैदान, सरदार तालीम, झुंजार क्लब, खंडोबा तालीम, जुना वाशी नाका, आठ नंबर शाळा, फिरंगाई तालीम येथे समाप्त अशी काढणेत येणार आहे.
यासह सायंकाळी चार स्टेज सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. सायं ६.०० वाजता राजारामपुरी १२ वी गल्ली, सायं.७.०० वाजता शाहूपुरी कुंभार गल्ली, रात्री ८.०० वाजता छत्रपती शिवाजी चौक, रात्री ९.०० वाजता कसबा बावडा भाजी मंडई येथे आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली स्टेज सभा घेण्यात येणार आहे.
Leave a Reply