
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हा स्वाभिमानी बाणा जपणारा जिल्हा आहे. शिवाजी पेठेतील स्वाभिमानी जनतेची अनेक उदाहरणे आहेत. पण, गेल्या काही वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या धनशक्तीस गारद कोल्हापूर शहरातील सर्वच स्वाभिमानी जनतेने कंबर कसली असून, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढ्यात शिवाजी पेठेची स्वाभिमानी जनशक्ती शिवसेना भाजप रिपाई रासप युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या बाजूने असल्याने विरोधकांचा टिकाव लागणार नाही, असे प्रतिपादन आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला. शिवसेना भाजप रिपाई रासप युतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ शिवाजी परिसरात आयोजित प्रचार फेरी प्रसंगी ते बोलत होते.
आज सकाळी प्रचार फेरीची सुरवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आमदार राजेश क्षीरसागर, प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार सुरेश साळोखे, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केली. यावेळी “जय भवानी जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद” अशा घोषणा देत प्रचार फेरी परिसर दणाणून सोडला. यासह प्रा.संजय मंडलिक यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. पुढे ही प्रचार फेरी पुढे उभा मारुती चौक, साकोली कॉर्नर, तटाकडील तालीम, निवूत्ती चौक, गांधी मैदान, फिरंगाई मंदिर, आठ नंबर शाळा, जुना वाशी नाका, खंडोबा तालीम मार्गे झुंजार क्लब येथे येवून समाप्त करण्यात आली. यावेळी बोलतना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, एक कंपनीच्या माध्यमातून इंग्रज भारतात आले. त्यांनी देशावर हुकुमशाही करत राज्य केले. या जुलमी इंग्रजांना देशातून हाकलून काढण्यासाठी देशातील स्वाभिमानी जनतेने लढा उभारला आणि देशास स्वातंत्र मिळवून दिले. त्याच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यास गेल्या काही वर्षात एका धनशक्तीचे ग्रहण लागले आहे. सर्वच पक्षांशी सोयरिक करून सर्वच पदे आपल्या घरात घेवून कोल्हापूर जिल्हास लुटण्याचा डाव विरोधकांकडून होत आहे. इस्ट इंडिया कंपनीप्रमाणे परजिल्ह्यातून येवून कोल्हापुरातील सत्ता धनशक्तीच्या जीवावर मिळविल्या. परंतु, कोल्हापूरच्या सुजाण जनतेने वेळीच या धनशक्तीचा डाव ओळखला असून, कोल्हापूर जिल्ह्यातून अशी प्रवृत्ती वेळीच हद्दपार करण्यासाटी प्रा. संजय मंडलिक यांना विजय करावे, असे आवाहनही आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
Leave a Reply