
कोल्हापूर: नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असा विश्वास महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी व्यक्त केला.
प्रचाराचा शेवटच्या दिवशी भव्य शक्तिप्रदर्शन करत गांधी मैदान येथून पदयात्रा काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गाने या पडयात्रेची सांगता दसरा चौक येथे करण्यात आली.शिवसेनेचा खासदार कोल्हापूर मध्ये निवडून यावा ही बाळासाहेबांची इच्छा होती. असेही प्रा. मंडलिक यांनी सांगितले.
भाजप शिवसेना युतीची एकत्रित ताकद दाखवून मंडलिक यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव,माजी आमदार सुरेश साळोखे, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदिप देसाई, किशोर घाटगे,हेमंत आराध्ये आदी उपस्थित होते.
Leave a Reply