सीपीआर घेणार पुन्हा मोकळा श्वास

 

IMG_20160101_172832कोल्हापूर : सीपीआरमधील प्रशासनात गतिमानता आणून सर्वच स्टाफचे प्रबोधन करणार त्याचबरोबर सीपीआरला सर्व समस्यांमधून मुक्त करण्यासाठी काही ठोस पाऊले उचलली आहेत.असे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.यामध्ये २ नूतन उप अधिष्ठाता प्रा.डॉ.दत्ता पावले पदवी पूर्व आणि प्रा.डॉ.वसंत देशमुख पदव्युत्तर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच १ जानेवारीपासून अन्जोग्राफी चा दर ६५०० होता तो ३ हजार केला गेला आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यात अद्ययावत असे ६ कोटी ५१ लाख रुपये किमतीचे सिटी स्कॅन मशीन लवकरच सीपीआरमध्ये बसविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.सर्व रोगावरील चाचण्या सीपीआरमधेच होतील,राजीव गांधी जीवनदायी योजना राबविण्यात रुग्णालय यशस्वी झाले आहे.यावर्षी ३४५ रुग्णांनी याचा लाभ घेतला.यापुढेही लाभार्थी वाढविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील.उपलब्ध औषधेच रुग्णांना दिली जातील.डॉक्टरचे नाव असल्याशिवाय औषधे मिळणार नाहीत.अशा सक्त सूचना डॉक्टरना दिल्या जातील.असेही ते म्हणाले.२१०० कर्मचारी ६६५ बेड्सच्या या सरकारी रुग्णालयात २ अद्ययावत व्हेंटीलेटर आणि २ व्हेंटीलेटर उपलब्ध होणार आहेत.तसेच अतिक्रमणाबाबत बोलताना ते म्हणाले गार्ड,वॉकी टाकी यांची मागणी केली आहे.त्यामुळे लवकरच या गोष्टींना आळा बसेल.तसेच कोणी रुग्णालयात दिशाभूल करत असेल तर तसे फलकही लावलेले आहेत असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!