
कोल्हापूर: नटसम्राट या भव्य दिव्य चित्रपटाचा आज प्रेस शो होता त्यानिमित्त नाना पाटेकर आज कोल्हापुरात आले होते. कोल्हापुरात हा शो करताना विशेष आनंद आहे.ज्या मातीत मराठी चित्रपट रुजला, वाढला, बहरला त्या कोल्हापूर नगरीत आम्ही आमचा चित्रपट घेऊन आलोय. इथला प्रेक्षकवर्ग अतिशय सुजाण आहे.मराठी चित्रपटावर तो मनापासून प्रेम करतो.असे उद्गार या चित्रपटाच्या टिमने काढले.आज या खास शोसाठी गानसरस्वती किशोरीताई आमोणकर आलेल्या आवर्जून उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीने या प्रसंगाला वेगळं महत्व प्राप्त झालं आहे. यावेळी दिग्दर्शक महेश मांजरेकर,मेधा मांजरेकर, जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह सर्व मान्यवर, निमंत्रित आणि पत्रकार उपस्थित होते.
Leave a Reply