
घुणकी (सचिन कांबळे)
: येथील परिसरात किणी, घुणकी, चावरे, वाठार, तळसंदे, नवे पारगाव,जुने पारगाव, निलेवाडी, मनपाडळे, पाडळी, अंबप परिसरात ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. हातकणंगले लोकसभा मतदार संघात शासनाने या निवडणुकीत पहिल्यांदाच दिव्यांग व्यक्तींना नेण्या-आणण्याची सोय केली. त्यांच्यासाठी वाहने, व्हीलचेअर ची सोय झाल्यामुळे दिव्यांग मतदारांना मतदान केंद्राजवळ जाणे सोयीचे झाले. त्याचबरोबर मतदान केंद्र परिसरात सी.सी.टीव्ही ची सोय केल्याने नेहमी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर नियंत्रण राहिले. तसेच मतदानाला आलेल्या मतदारा चे आरोग्य बिघडल्यास तात्काळ उपचार व्हावेत यासाठी वैद्यकीय मदत पथके तैनात असल्यामुळे मतदारातून समाधानाच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.

लोकसभेला पहिल्यांदाच विद्यमान खासदार राजू शेट्टी व शिवसेनेचे चे उमेदवार धैर्यशील माने यांच्यात काटा लढत असल्याचे दिसून आले. मतदारांना दोन्ही गटाचे कार्यकर्ते केंद्राकडे येण्यासाठी प्रवृत्त करत होते. त्यामुळे दुपारी ४ पर्यंत बहुतांशी गावात साठ टक्के पर्यंत मतदान झाल्याचे दिसून आले.
या परिसरात दोन्ही गटाचे कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी समजुतीची भूमिका घेतल्याने कोठेही वाद, गोंधळ झालेला दिसून आला नाही. वडगाव पोलिस ठाणे अंतर्गत पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने कोणती दुपार पर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. हातकणंगले विधानसभेचे आमदार डॉ. सुजीतकुमार मिणचेकर यांनी काही गावातील केंद्रांना भेटी देऊन मतदानाची माहिती घेतली. तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी यांनी प्रत्येक गावातील केंद्राला व त्यांच्या कार्यकर्त्यांना भेट देऊन मतदानाविषयी माहिती घेतली शासकीय अधिकाऱ्यांच्या योग्य नियोजनामुळे मतदारांना कोणताही त्रास झाला नाही त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. यामध्ये शासकीय यंत्रणा सतर्क राहिल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यामध्ये विस्तार अधिकारी संतोष पवार, मंडल अधिकारी सौ अनिता खाडे, ग्रामसेवक अशोक भोसले, तलाठी प्रशांत काळे, कोतवाल लक्ष्मण पवार, ए व्ही एम मशीन अधिकारी कुमारी सिमर प्रीत, पोलीस पाटील संदीप तेली, प्रदीप मोहिते, संग्राम कक्ष श्रीकांत मोहिते, अनिल थोरात, दिनकर पाटील, तसेच पोलीस यंत्रणानेही मतदान शांततेत पार पाडण्यासाठी चांगलीच कंबर कसली त्यामध्ये वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, सहाय्य्क पोलीस निरीक्षक प्रियंका शेळके, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल पाटील, जमादार एम डी मुजमुले (परळी) जमादार आर एम एकरस, जमादार बी पी फड, होमगार्ड दादासाहेब देसाई, सतीश जोग, यांनी काम पहिले पहिल्यांदाच लोकसभेला मतदारांनी इतका मोठा उत्साह दाखविल्याने लोकसभेच्या निकालाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
घुणकी परीसरातील मतदान टक्के किणी ७६ टक्के, घुणकी ७५.४०, चावरे ७२, वाठार ७०.७३, तळसंदे ७२, नवे पारगाव , जुने पारगाव ७४ ,निलेवाडी ८५.८७ , मनपाडळे ७२.५२, पाडळी ७६, अंबप ७०.४१.
Leave a Reply