भगिनी मंचच्यावतीने १० ते १२ मे दरम्यान “भगिनी महोत्सवा” चे आयोजन

 

कोल्हापूर : दिलखेचक नृत्य, धमाल विनोदी अभिनय आणि सुरेल गायकी अशा तिहेरी मनोरंजनाचा आस्वाद देणारे कार्यक्रम यंदा कोल्हापूर वासियांना अनुभवता येणार आहेत. कोल्हापूरचा महोत्सव “भगिनी महोत्सव”. आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन संचालित भगिनी मंचच्या वतीने सलग ९ व्या वर्षी त्याच रंगात आणि त्याच जल्लोषात “भगिनी महोत्सव २०१९” चे भव्य आयोजन “प्रायव्हेट हायस्कूल मैदान” मंगळवार पेठ कोल्हापूर येथे दि. १०, ११, १२ मे रोजी करण्यात आले आहे.
महिला बचत गटांना बळकटी मिळावी, महिलांमधील कलागुणांना वाव मिळावा, महिला पुरुषांच्या बरोबरीने पुढे याव्यात, तसेच स्वयं-रोजगार निर्मिती करून महिलांना आर्थिक पाठबळ देणे, यासह अनेक उद्देश डोळ्यासमोर ठेऊन भगिनी मंच गेली ९ वर्षे कार्यरत आहे. या भगिनी महोत्सवामध्ये चला हवा येऊ द्या फेम कॉमेडी किंग कुशल बद्रिके आणि अभिनेत्री श्रेया बुगडे यांची कॉमेडीची जुगलबंदी, महिलांसाठीच्या लावणी कार्यक्रम होणार आहेत.अशी माहिती भगिनी मंच च्या अध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या महोत्सवाचे खास उद्दिष्ट म्हणजे महिलांना स्वावलंबी बनविणे, या उद्दिष्टात भगिनी मंच सफल होताना दिसत असून, गेल्या ८ वर्षातील भगिनी महोत्सवास महिला बचत गटांचा वाढता प्रतिसाद याची पोहच पावती देते. या महोत्सवामध्ये सुमारे २५० महिला बचत गटांना मोफत विक्री स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याद्वारे महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना या तीन दिवसात बाजारपेठ उपलब्ध करण्याचे काम भगिनी मंचच्या वतीने करण्यात येणार आहे. यासह उपस्थित प्रेक्षक महिलांसाठी रोज लकी ड्रॉ द्वारे एल.सी.डी टीव्ही यासह ५० पैठणी साड्या गिफ्ट देण्यात येणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दि. १० मे रोजी सकाळी ११ वाजता प्रायव्हेट हायस्कूल मैदान, कोल्हापूर येथे महापौर सौ. सरिता मोरे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थिती संपन्न होणार आहे.याकरिता सामाजिक, सांकृतिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन समारंभानंतर “स्त्री भृण हत्या आणि महिलांवरील अत्याचार थांबवा” अशा आशयाचा संदेश देण्यात येणार आहे. यानंतर विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेवून समाजात आपले स्थान निर्माण करणाऱ्या १०० भगिनींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
महिला बचत गटांना देण्यात येणाऱ्या मोफत स्टॉल करिता शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ येथे संपर्क साधावा.यावेळी मंगल साळोखे, पूजा भोर, मीना पोतदार,गौरी माळदकर,सोनाली पेडणेकर, गीता भंडारी,पूजा कामते, शहीन काझी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!