
कोल्हापूर : दि २ मे रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मंत्रालय लिपिक पदाच्या परीक्षेत विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या सुहास पाटील रा.कणेरी, ता.करवीर आणि धीरज बजागे रा.केर्ली ता.पन्हाळा या दोन विद्यार्थ्यांची मंत्रालय लिपिक पदी निवड झाली. ग्रामीण आणि शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या या विद्यार्थ्यांच्या यशामुळे सातत्यपूर्ण कष्टाची तयारी असेल तर कोणत्याही परिस्थितीत यश खेचून आणता येते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या दोन्ही विद्यार्थ्यांचा त्यांच्या भरघोस यशाबद्दल विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री राहुल चिकोडे यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री राहुल चिकोडे, MPSC विभाग प्रमुख प्रा.अमित लव्हटे तसेच विद्या प्रबोधिनीच्या तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले.
Leave a Reply