
घुणकी : (सचिन कांबळे) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ग्रुप यांच्यावतीने पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांची २९४ वी जयंती साजरी करण्यात अली.
यावेळी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे धनगर समाजातील जेष्ठ नागरिक शामराव सिद (अण्णा ) यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी अर्पण ब्लड बँक यांच्यावतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी तरुणांनी रक्तदानाला उत्तम प्रतिसाद देत एकूण ३५ जणांनी रक्तदान केले. अर्पण ब्लड बॅंकचे संजय पोवार, अक्षय पाटील. शीतल पाटील, श्रीदेवी ठाणेकर तेजस्विनी परीट व शिबिराचे नियोजक बाजीराव शेवाळे उपस्थितीत होते. तसेच सांयकाळी महाप्रसादाचे आयोजनदेखील करण्यात आले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन मोहिते, मल्हार सेनेचे अध्यक्ष शहाजी सिद, जिल्हा नियोजन समिती सदस्य आप्पासो मोहिते, उपसरपंच प्रल्हाद पाटील, माजी उपसरपंच जालिंदर नांगरे, ग्राम सदस्य अशोक जाधव, अविनाश हराळे, प्रा रघुनाथ सिद, महादेव मोहिते. संपत सिद, पत्रकारभूषण व स्पीड न्यूजचे पत्रकार सचिन कांबळे, जितेंद्र कांबळे, तसेच यावेळी तरुणांनी सामुदायिक अहिल्याबाई होळकर यांच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. समस्त धनगर समाज मोठ्या संख्यने उपस्थितीत होता. तसेच गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संयोजक बाजीराव शेवाळे यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले व मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सिद यांनी आभार मांडले.
Leave a Reply