
कोल्हापूर:अवकाश, संशोधन, रॉकेटस सॅटेलाईट, ड्रोन तयार करण्याबरोबरच महाराष्ट्रात विज्ञानिष्ठीत समाज घडविण्याचा ध्यास घेऊन वाटचाल करणाऱ्या जरगनगर येथील कै.भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने सुरु करण्यात येणाऱ्या स्पेस इनोव्हेशन लॅबचे उद्घाटन ६ जून रोजी सकाळी ९.३० वाजता संभाजीनगर येथील निर्माण चौकात करण्यात येणार आहे. राज्याचे महसुल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल.भारतात पहिल्यांदाच महाराष्ट्रात आणि ते ही कोल्हापुरात अशा पद्धतीची लॅब सुरू होत आहे.अशी माहिती अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
भालचंद्र चिकोडे ग्रंथालय आणि भारतातील अग्रगण्य संस्था एसडीएनएक्स इनोव्हेशन लॅबमध्ये सहकार्य करार झाला आहे.या करारानुसार कोल्हापुरात ही लॅब सुरू होत आहे.
भारतातील एक मोठी संस्था म्हणून एसडीएनएक्सकडे पाहिले जाते.
डॉ.जयंतराव नारळीकर,डॉ. वसंतराव गोवारीकर, डॉ. रघुनाथ माशेलकर,डॉ.ए.पी. जे.अब्दुल कलाम, डॉ.होमी भाभा, डॉ.अनिल काकोडकर, कोल्हापुरातील डॉ.शिवराम भोजे अशा अनेक वैज्ञानिकांनी भारताचे नाव वैज्ञानिक क्षेत्रात उज्ज्वल केले आहे.या वैज्ञानिकांमध्ये कोल्हापुरच्या तरूणांचा समावेश झाला पाहिजे, याचा ध्य़ास घेऊनच ग्रंथलायच्यावतीने या लॅबची उभारण्याचा मानस ठरवण्यात आला.
मानवी जीवन सुहह्य व सुखी बनविण्यासाठी विज्ञानाची गरज लागते. विज्ञानाच्या साह्याने मानवाने खुप प्रगती करून समाजात बदल घडवून आणला. मुलांमधील संशोधन वृत्तीला चालना देऊन जास्तीत जास्त वैज्ञानिक बनले पाहिजेत. यासाठी ही लॅब अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. मुलांमध्ये अंतराळ संशोधनाची आवड निर्माण करणे, अंतराळ आणि विज्ञान याबद्दलचे गैरसमज दूर कऱण्य़ासाठी प्रयत्न केले जाणार आहे.
या लॅबमध्ये मुलांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शिकवण्यात येईलच शिवाय प्रात्याक्षिकही दाखविण्यात येईल. महाराष्ट्रातील ही पहिलच लॅब सुरू होत आहे. जरगनगर येथील ग्रंथालयामध्ये ही लॅब असणार आहे.
रोबोटिक आर्म, ड्रोन, रॉकेट, सॅटेलाईट असे वेगवेगळे तब्बल १२ प्रोजेक्ट वर्षभर शिकवले जाणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला ते स्वतः बनवता येणार आहेत शिवाय त्यासाठी लागणारे सगळे किट्स पुरवले जाणार आहेत. यासाठी माफक फी ही असणार आहे. समाजात आधुनिक विज्ञान निष्ठा व लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणे आवश्यक आहे.
या लॅबचा उद्घाटन सोहळा ही भव्यदिव्य असणार आहे. प्रत्यक्षात एक रॉकेट उडवून याची सुरवात होईल.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून हे साकारत असून उद्घाटनादिवशी एसडीएनएक्स संस्थापक संजय राठी, इस्त्रोचे माजी प्रकल्प संचालक टी. के. सुंदरमुर्ती, इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्राचे माजी संचालक पद्मश्री डॉ.शिवराज भोजे, डीआरडीओचे माजी संशोधक वराप्रसाद मुरली, नासा हॅनीवेल स्पेस एज्युकेटरच्या अपूर्वा जाखडी उपस्थित राहणार आहे.
या पत्रकार परिषदेला कै. भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे अभिजीत परांजपे,योगेश चिकोडे, जितेंद्र बामणे, जयदीप मोरे, सचिन साळोखे, प्रमोद पाटील, विजय पाटील, शंतनू मोहिते,सागर पाटील, सुमित पाटील,कृष्णा आतवाडकर, नितीन कामत आदी उपस्थित होते.
Leave a Reply