
कोल्हापूर: १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा २० वा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. तरी यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी या विषयावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात विविध प्रकारच्या स्पर्धा, चर्चासत्रे,टँकर मुक्त व पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र कसा करता येईल यासाठी गावोगावी चर्चा व उपाययोजना,जनजागृती, शेतकऱ्यांना माहिती देणे,प्रत्यक्षात श्रमदान करणे,गाळ उपसणे जेणेकरून या माध्यमातून महाराष्ट्रातील दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रयत्न केले जाणार आहेत असे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
Leave a Reply