एक मंत्रिपद मिळाल्याने आम्ही नाराज नाही: उध्दव ठाकरे

 

कोल्हापूर: शिवसेनेचे अठरा खासदार लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आले. परंतु लोकसभेत अवजड उद्योगमंत्री एवढे एकच मंत्रीपद शिवसेनेला देण्यात आले आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. परंतु आम्ही कोणत्याही बाबतीत नाराज नसून सर्व आपलीच माणसे आहेत. आपल्याच माणसांकडून हक्कानेच जे पाहिजे ते मागू शकतो अशा शब्दात आपली भावना व्यक्त केली. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. लोकसभेच्या प्रचाराचा शुभारंभ अंबाबाईला साकडे घालुन करण्यात आला होता. तोच नवस फेडण्यासाठी उद्धव ठाकरे आज कोल्हापुरात खाजगी विमानाने आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्राचा विधानसभेच्या निवडणुका
येऊ घातल्या आहेत. परंतु निवडणुकीसाठी कोणताही अजेंडा तयार नसल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेना नेहमी वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करत असते. कोणत्याही निवडणुका आल्या तरी समाजकारणाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच वीस टक्के राजकारण हे समाजकार्यासाठीच केले जाते असे त्यांनी स्पष्ट केले.विधानसभा निवडणुकीत ही युती असणार आहे हे आमचं ठरलंय असे सांगून ज्या दृश्य अदृश्य शक्तींनी आम्हाला मदत केली त्यांचे आभार यावेळी ठाकरेंनी मानले. दुष्काळाबद्दल प्रश्न विचारले असता दुष्काळ दौरा करणे हे चुकीचे आहे असे मला वाटते. कारण महाराष्ट्रात युतीचे सरकार आहे आणि ते दुष्काळासाठी नेहमीच चांगले काम करत आहे. तरीदेखील जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना अन्नधान्य पुरवठा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आणि लवकरात लवकर पाऊस पडू दे आणि बळीराजा सुखाउदे दे असे साकडे देखील त्यांनी श्री अंबाबाई चरणी घातले.यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!