
कोल्हापूर : ओढयावरील यलम्मा मदीर शेजारील नाल्याची आज आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पाहणी केली. यावेळी त्याठिकाणी नाल्यातील गाळ व कचरा काढणेच्या सुचना केल्या. तसेच नाल्यामध्ये कचरा टाकू नये यासाठी त्याठिकाणी सुचना फलक लावणेच्या सुचनाही केल्या. नाल्याशेजारी खुल्या जागेमध्ये वृक्षारोपण करणे, कठडयाची रंगरंगोटी व ड्रेनेजच्या पाईपची दुरुस्ती तातडीने करुन घेण्याच्या सुचनाही संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी गटनेता विजय सुर्यंवशी, अरुण बारामते, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील, आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, स्वप्निल उलपे, उदय गायकवाड, पारस ओसवाल, अजित कोराणे आदी उपस्थित होते.
Leave a Reply