
जेरुसलेम :”जगभर मानसशास्त्र हा विषय मागे पडला असून त्याची जागा नीरोसायन्स यांनी घेतली आहे .मेंदूचा अभ्यास करून मेंदूची एक प्रतिकृती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास जगात अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे त्यामुळे अभ्यासक्रमामध्ये मानसशास्त्र ऐवजी मेंदू आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांना प्राधान्य देण्याची गरज आहे “असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सुभाष देसाई यांनी एम्पिरिकल आणि थिओरेतिकल रिसर्च या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये२८ मे रोजी बोलताना मांडले .परिषदेमध्ये पहिलेच भाषण करण्याचा मान त्यांना मिळाला. या परिषदेचे अध्यक्ष प्रोफेसर लिरिक झिमरमन डायरेक्टर सपोर्ट ऑफिस आणि ग्लोबल इंगेजमेंट इजराइल हे होते. शिवाजी विद्यापीठातील बॉटनी विभागाचे प्रमुख डॉक्टर डी के गायकवाड ,मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक आणि नेपाळ चे काही प्राध्यापक या परिषदेला आवर्जून उपस्थित होते. ही एक दिवशीय परिषद जगातील एक सुप्रसिद्ध हॉटेल येहुदा जेरुसलेम येथे भरली होती.
मुंबई विद्यापीठाचे परराष्ट्र विद्यार्थी कक्षाचे प्रमुख डॉक्टर सुनील पाटील, डॉक्टर मनीषा गुरव आणि पालघरच्या डॉक्टर सोनोपंत दांडेकर शिक्षण संस्थेचे एडवोकेट तिवारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही परिषद संपन्न झाली .या परिषदेतील शोधनिबंधाच्या सादरीकरणानंतर भारत आणि इजराइल या दोन देशांमध्ये ज्ञानाच्या देवाणघेवाणी बद्दल सामंजस्य करार झाल्याची माहिती इजराइल अधिकाऱ्यांनी दिली. या परिषदेनंतर
तेल अविव विद्यापीठ टेक्नोनॉन, बेन गुरियन विद्यापीठ , किबुत्स या संस्थांशी साऱ्यांनी भेट दिली टेक्नोनॉन या एका वैज्ञानिक संस्थेने जगाला विविध क्षेत्रातील 9 नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ दिले आहेत. यानंतर भारतीय प्रतिनिधीनी डेड सी, येशू ख्रिस्त यांची जन्म ठिकाण, क्रुसावर चढवलेले ठिकाण ,ज्यू लोकांची वेलींग वॉल अशा काही धार्मिक ठिकाणाला ही भेटी दिल्या. त्याचप्रमाणे इजराइल मधल्या पाण्याच्या पुनर्वापराचे प्रयोग आणि वाळवंटामध्ये फुलवलेल्या द्राक्षबागा, केळीच्या बागा ,भेंडी आणि अनेक फळांची शेती ही प्रत्यक्ष भेट देऊन बघितली. यातून महाराष्ट्राच्या कोरडवाहू जमिनीमध्ये नव्या तंत्रज्ञानाने शेतीचे प्रयोग यशस्वी होतील असा साऱ्यांना विश्वास निर्माण झाला .अनेक विद्यापीठांमध्ये इंग्रजी माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रगत ज्ञान मिळवणे शक्य आहे याचा आढावा घेण्यात आला.
Leave a Reply