
कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापूर येथील विशेष पोलीस पथकाने शरद कळसकर यांना अटक करून ११ जून या दिवशी कोल्हापूर येथील न्यायालयासमोर उपस्थित केले. सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती एस्.एस्. राऊळ यांच्यासमोर ही सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधिशांनी कळसकर यांना १८ जूनअखेर पोलीस कोठडीत ठेवण्याचा निर्णय दिला. शरद कळसकर यांच्या वतीने अधिवक्ता संजय धर्माधिकारी यांनी युक्तिवाद केला, तर सरकारी पक्षाच्या वतीने अधिवक्ता शिवाजीराव राणे यांनी युक्तिवाद केला. या वेळी अधिवक्ता श्रीपाद होमकर हेही अधिवक्ता संजय धर्माधिकारी यांच्या समवेत उपस्थित होते. अधिवक्ता संजय धर्माधिकारी यांनी संशयित शरद कळसकर यांना प्रतिदिन भेटण्याची मागणी केली असता न्यायालयाने ती मान्य केली.
Leave a Reply