
कोल्हापूर : सहकारी साखर कारखानदारी आपल्या अभ्यासू आणि निस्पृह कार्यपद्धतीने मानदंड निर्माण केलेले आणि कागलच्या भूतपूर्व अधिपती घराण्याचे वारस असलेले स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याची जय्यत तयारी कागल येथील श्री छत्रपती शाहू साखर कारखाना परिसरात केली असून आज गुरुवारी दुपारी एक वाजता पुतळा अनावरण सोहळा व भव्य शेतकरी मेळावा संपन्न होत आहे. यासाठी शाहू ग्रुप मधील सर्व संस्था पदाधिकारी आणि राजेगटाचे
कार्यकर्ते यांनी हा सोहळा अभूतपूर्व होण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. छत्रपती शाहू कारखान्याचे प्रधान कार्यालय असणारे श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवन परिसरात हा पुतळा उभारण्यात आला आहे. हे एक स्मारक असून ब्राँझधातूचा हा अर्धपुतळा आहे. हिरवळीचे गालीचे, फुलझाडे आणि पाठीमागे भीतीशिल्पे आहेत.परिसर सुशोभित करण्यात आला आहे.
विक्रमसिंह घाटगे यांनी कृषी, जलसिंचन, सहकार, साखर, उद्योग, शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामांचा समावेश यात आहे.राजेंचा पुतळा उभा रहावा अशी लोकांच्या मधून मागणी होती ती आज पूर्णत्वास येत आहे असे शाहू ग्रुप चे अध्यक्ष आणि पुणे म्हाडा चे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी सांगितले. तसेच
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शाहू महाराज छत्रपती व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत कारखान्याचे शैक्षणिक संकुल जयसिंगराव घाटगे हायस्कूल शेजारी भव्य शेतकरी मेळावा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुपारी एक वाजता हा कार्यक्रम होणार आहे.नूतन खासदार यांचा सत्कार समारंभ ही होणार आहे.
Leave a Reply