ड्रीम हॉलिडेजच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न

 

कोल्हापूर : प्रत्येक कुटुंबाला आणि कुटुंबातील प्रत्येकाला अतिशय वाजवी दरात पर्यटनाचा परिपूर्ण आनंद देणाऱ्या वीणा वर्ल्ड या ट्रॅव्हल कंपनीने गेल्या सहा वर्षात लाखो पर्यटकांना देश-विदेशात जगभ्रमंती घडवून आणली. त्यांची स्वप्ने सत्यात उतरवली. महाराष्‍ट्रासह भारतात अनेक शहरातून आणि जगाच्या कानाकोपर्‍यातून पर्यटक बुकिंग करतात. उत्कृष्ट सेवा आणि विश्वासार्हता या वीणा वर्ल्ड या द्विसूत्रीमुळेच पर्यटकांनीही वीणा वर्ल्ड वर विश्वास टाकला. कोल्हापूरमध्येही वीणा वर्ल्डचे सेल्स पार्टनर ड्रीम हॉलिडेज गेल्या सहा वर्षापासून मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. ड्रीम हॉलिडेजकडे आत्तापर्यंत साडेचार हजाराहून अधिक कोल्हापूरकरांनी विविध टूर्सचे बुकिंग केलेले आहे. आणि त्याबाबत ते समाधानी देखील आहेत. वर्षागणिक बुकिंगसाठी कार्यालयात होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता त्यांच्या सोयीसाठी ड्रीम हॉलिडेजने आता मोठ्या प्रशस्त जागेत आपलं कार्यालय सुरू केलं आहे. कोल्हापूरमधील ताराबाई पार्क येथे पितळी गणपती जवळ असलेल्या ‘द एम्पायर’ या इमारतीमध्ये वीणा वर्ल्डचे सेल्स पार्टनर ड्रीम हॉलिडेजने प्रशस्त कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन वीणा वर्ल्डच्या व्यवस्थापकीय संचालिका वीणा पाटील आणि संचालक सुधीर पाटील यांच्या हस्ते पार पडलं. कोल्हापूरकरांची पर्यटनाची आवड वीणा वर्ल्ड आणि ड्रीम हॉलिडेजवरील पर्यटकांचा विश्वास यामुळे व्यवसायाला मिळालेला पाठिंबा आणि बळ यामुळे आपण या नूतन व प्रशस्त जागेत व्यवसाय विस्तारित करू शकलो, अशी प्रतिक्रिया ड्रीम हॉलिडेजच्या संचालिका अबोली सोनटक्के व निलेश रावळ यांनी दिली. आता कोल्हापूरकरांना मुक्तपणे पर्यटनाची आवड जोपासता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!