कोल्हापूर:कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स व राज्य सरकारच्या सहकार्याने एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबईतर्फे येथील लहान उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांवर प्रशिक्षित करण्यासाठी येत्या मंगळवारी (ता. १८) हॉटेल पॅव्हेलियन येथे चर्चासत्राचे आयोजन केले आहे.आंतरराष्ट्रीय विपणन, गुणवत्ता प्रमाणन, निर्यात खर्च आणि विद्यमान व इच्छुक निर्यातदारांसाठी किमती ठरवणे यांसारख्या महत्त्वाच्या कौशल्यांचा समावेश असेल. या सत्रात महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कक्ष (एमएआयटीआरआय) संस्थेचेही योगदान आहे.देशाची निर्यात दुप्पट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध स्तरावर कार्य करीत आहे. राज्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे (एमएसएमई) जागतिक स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी कौशल्याच्या विकासावर राज्यव्यापी जागरूकता मोहिमेचा पुढाकार घेण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रमुख कार्यक्रम जागतिक व्यापार दिन महाराष्ट्च्या तिसऱ्या आवृत्तीचा हा कार्यक्रम आहे.
एमवीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईच्या संशोधनानुसार कोल्हापूरमध्ये वस्त्रोद्योग, लेदर,अभियांत्रिकी आणि कृषी-प्रक्रिया यांसारख्या क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती आणि जागतिक मूल्य श्रृंखला एकत्रिकरणासाठी उत्तम क्षमता आहे. कोल्हापूरमधील सुमारे ८० टक्के सूक्ष्म आणि लघु उद्योग कृषी-प्रक्रिया आणि सूती वस्त्र उद्योगात गुंतलेले आहेत.दरम्यान, कोल्हापूरमधील निर्यात क्षमतेवर सीनियर डायरेक्टर-एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या सुश्री रूपा नाईक यांनी सांगितले की, कोल्हापूरमधील चामडी वस्तू, कापड आणि अभियांत्रिकी वस्तू निर्यात करण्यायोग्य वस्तूंपैकी काही आहेत. जिल्ह्यातील निर्यातदारांना मध्यवर्ती वस्तू व सेवा पुरवून एमएसएमई अप्रत्यक्षपणे निर्यात करण्यास योगदान देऊ शकतात. प्रभावी प्रशिक्षण आणि मार्गदर्शनासह, कृषी-प्रक्रिया आणि सुती कापडांमधील एसएमई जागतिक बाजारपेठेत यशस्वीरीत्या निर्यात करू शकतात.महाराष्ट्र सरकारचे अधिकारी, डब्ल्यूटीसी मुंबई इन्स्टिटयूटचे वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग तज्ज्ञ या चर्चासत्रात मार्गदर्शन करतील. दरम्यान, मंगळवारी दुपारी तीन ते रात्री आठ या वेळेत होणाऱ्या कार्यशाळेसाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सशी संपर्क साधावा.
Leave a Reply