
कोल्हापूर: वटपोर्णिमा हा ऐतिहासिक व धार्मिक महत्व असलेला दिवस. सत्यवान सावित्री आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावे, संकटे टळावीत व वैवाहिक जीवन सुखाचे व समृद्धीचे जावे. सोबत मनुष्य जीवनामध्ये वृक्षांचे असलेले महत्व कळावे, पर्यावरणाची जपणूक व्हावी व या सर्वांचा सात्विक आनंद वर्षाचे ३६५ दिवस काम व मेहनत करीत असलेल्या घरेलू महिला कामगारांना मिळावा म्हणून नाम. चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री कोल्हापूर व सौ. अंजली चंद्रकांत पाटील यांचे प्रेरणेतून कै. महादेव जाधव वाचनालय व पंडीत दीनदयाल उपाध्याय घरेलू कामगार संघ यांचेवतीने सकाळी आज दुपारी १२.०१ मिनिटांनी राजारामपुरी ४ थी गल्ली कै. महादेव जाधव वाचनालय येथे ५०० घरेलू कामगार स्त्रियांच्या उपस्थितीत विधीपूर्वक वटपूजा करणेत आली.सदर कार्यक्रम सौ. दिपाली विजय जाधव, सचिव, कै. महादेव जाधव वाचनालय व सौ. सुधा प्रवीण इंदुलकर, संचालक, कोल्हापूर महिला सह. बँक यांचे वतीने उपस्थित सर्व महिलांना अल्पोपहार देवून साडी वितरीत करून त्यांचा गौरव करणेत आला. तसेच यावेळी सौ. रेश्मा शेख, सौ. छाया ननवरे, सौ. गीता राऊत, सौ. लक्ष्मीबाई कांबळे, सौ. अक्काताई देवकुळे, सौ. मनीषा पाटोळे, सौ. कविता मिसाळ, सौ. माया जाधव, सौ. राजनंदिनी विश्वास जाधव, सौ. कल्पना कदम, सौ. सुनिता भोसले, उपस्थित होत्या.
Leave a Reply