
कोल्हापूर: काल सायंकाळी सीबीएस परिसरातील वटेश्वर मंदिर जवळ एक गाईचं वासरू बराच वेळ मृत्युमुखी पडलेले असून लोकांची येता-जाता गर्दी होत होती.महेश उरसाल यांनी तात्काळ समस्त हिंदुत्ववादी संघटनेचे नेते , गोरक्षक श्री संभाजी उर्फ बंडा दादा साळुंखे यांना फोन लावून त्या गायीच्या वासराबाबत सविस्तर माहिती दिली. बंडा साळुंखे त्यांच्या कुटुंबाला घेऊन एका समारंभाला चालले होते.मात्र निरोप मिळताच त्यांनी समारंभाला जाण्याचे टाळून तातडीने वटेश्वर मंदिराजवळ गेले. तेथे ते वासरू पाहिले आणि नेहमीप्रमाणे कोल्हापुरातील गाई म्हशी सांभाळणाऱ्या मालकांना फोन लावले . सदरचे वासरू मेले असल्यामुळे त्या सगळ्या मालकांनी हे आमचे नाही असे एक सुरात सांगायला सुरुवात केली.
त्यामुळे हा जबाबदारी झटकण्याचा प्रकार लक्षात आला.मात्र त्या वासराचा विधिवत अंत्यसंस्कार करणेही तितकेच गरजेचे असल्यामुळे बंडा साळुंखे यांनी महापालिकेचे अधिकारी सचिन जाधव यांना फोन करून एक वाहन आणि एक जेसीबी देण्यास सांगितले. त्या पद्धतीने थोड्याच वेळात महापालिकेचे त्या प्रभागातील मुकादम वाकरेकर हे एक वाहन घेऊन तेथे आले. तेथून त्यांच्या सोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि बंडा साळुंखे यांनी सदर गाईचे वासरू उचलून त्या गाडीत ठेवून कसबा बावडा येथील झूम प्रकल्पाच्या अलीकडे ते नेण्यात आले. तिथे जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा करून सदर वासराला त्यामध्ये ठेवण्यात आले. त्याच्यावर रितीरिवाजानुसार कापड, मीठ टाकून इतर अंत्यविधीप्रमाणे तिची पूजा करून तो खड्डा बुजविण्यात आला.
सदर विषयी सामाजिक भान ठेवत बंडा साळुंखे यांनी तातडीने हालचाल केली. त्यामुळे गायीच्या बाबतीत ते किती दक्ष आहेत हे पुन्हा एकदा दिसून आलं.
याप्रसंगी अभी सावंत,सचिन मांगूरे,महापालिकेचे मुकादम वाकरेकर आणि महापालिकेचे कर्मचारी तसेच अधिकारी सचिन जाधव यांनी परिश्रम घेतले.
Leave a Reply