
कोल्हापूर : जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातल्या दिगवडे इथल्या शाळेतील बाजीराव पाटील या शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अनोखी पद्धत वापरली.
शाळेचा पहिला दिवस म्हटलं की हटके स्टाइलने नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत केल जाते. शहरात असणारी ही प्रथा आता कोल्हापूरच्या ग्रामीण भागात पोहचली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील दिगवडे इथल्या प्राथमिक शाळेतील बाजीराव पाटील या शिक्षकाने आज शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांना चक्क सजवलेल्या बैलगाडीतुन आणले. एवढेच काय तर ही बैलगाडी ऊस रंगीबेरंगी फुगे आणि बैलांना झुल पांघरून सजवली होती. या सोबतच शाळेच्या बँड पथकानेही या नवीन विद्यार्थ्यांचं वाजत गाजत स्वागत केलं. सर्व नवीन विद्यार्थ्यांची मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्यावरून काढण्यात आली. तसेच त्यांचे उत्साहात स्वागत शाळेत करण्यात आलं. या मिरवणुकीत गावकरी ही सहभागी झाले होते. नव्या विद्यार्थ्यांची आगळ्या वेगळ्या स्टाईलने बैलगाडीतुन काढलेली मिरवणूक सर्वत्र चर्चेचा विषय ठरली.
Leave a Reply