
कोल्हापूर: युनायटेड नेशन्स च्या वाळवंटी करणारा विरोध यासाठी भारतात दिल्ली व कोल्हापूर या दोन ठिकाणी वसुंधरा संवर्धन दिन म्हणून 17 जून हा दिन साजरा करण्यात आला .संभाजीनगर एसटी आगारांमध्ये वृक्षारोपण आणि सेंद्रिय शेती याविषयी कार्यशाळा घेण्यात आली. याचे आयोजन युनोस्को चे शांतिदूत व आगाराचे वरिष्ठ व्यवस्थापक शितल बारस्कर यांनी केले होते अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर सुभादेसाई होते
सेंद्रिय शेतीचे एक प्रगतशील पुरस्कर्ते श्री .पी.डी.सावंत यांनी आपल्या शेतातून उत्पादित केलेल्या माल लंडनच्या बाजारात जातो असे सांगितले तर निसर्ग मित्र अनिल चौगुले यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व विशद केले .
डॉक्टर सुभाष देसाई आपल्या भाषणात म्हणाले की” निसर्ग आणि मानव यांच्यात संतुलन हरवल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत त्यासाठी पाण्याचा थेंब अन् थेंब योग्य रीतीने वापरणे आणि अधिक पाण्याचा अपव्यय टाळणे, वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल यावर भर देणे आणि वृक्ष संवर्धन यामुळे आपण दुष्काळावर मात करू शकू “डॉक्टर देसाई यांनी इजराइल या देशाने वाळवंटावर कमी पाण्यात शेतीचे तंत्रज्ञान विकसित करून नंदनवन बनवले आहे याची माहिती दिली.
आगार प्रमुख शितल बारस्कर यांनी आपल्या भाषणात वसुंधरा संवर्धनाचे महत्व आणि त्याचे जागतिक पातळीवर असणारे महत्त्वपूर्ण कार्य त्याबद्दल जागृती निर्माण करण्याची गरज विशद केली .
यावेळी वृक्षारोपण आणि विना अपघात काम केलेल्या चालकांचा गौरव करण्यात आला यावेळी आगारातल्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply