कोल्हापूर :योगातून आरोग्य संपन्नतेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. या योग दिनाचे औचित्य साधून प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर च्या वतीने कोल्हापूर शहरात पन्नासहून अधिक ठिकाणी २१ जून पर्यत महिलांसाठी मोफत शिबीरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सौ. प्रतिमा सतेज पाटील यांनी केले आहे.
या शिबिरांतर्गत रंगराव सूर्यवंशी यांचे हास्य योगा बरोबरच विजय भोसले यांच्या कडून महिला सबलीकरण ह्या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान देण्यात येणार आहे. तर डॉ. इरफाना पाटील ब्युटी टिप्स, डॉ. रेश्मा चरणे ह्या आहार विषयी, विद्यालक्ष्मी राजहंस ह्या अकुप्रेशर सुजोगरिंग बाबत, सुमती तितले महिल्यांच्या व्याधी आणि योगा याबाबत व्याख्यानासह डॉ. उरुणकर ह्या योगा विषयक माहिती देणार आहेत. या शिबिरामध्ये सहभागी महिलां मधून ‘प्रतिमा वेलफेअर योगा क्वीन २०१९’ निवडण्यात येणार आहे.
विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसांबरोबरच लकी ड्रॉ ही काढण्यात येणार आहे.
सदर शिबिरांचे दि. १७ पासून दि. २० जून २०१९ पर्यंत खालील प्रमाणे आयोजन केलेले आहे.
सुर्वेनगर- साळोखे हॉल, सायं ४ वाजता,
टेबलाईवाडी – हनुमान मंदिर सायं. ५ वाजता,
लाईन बाजार, त्र्यंबोली हॉल सकाळी ६ वाजता,
सोमराज कॉम्प्लेक्स- नाळे कॉलनी, (संभाजीनगर ) येथे सायंकाळी ४ वाजता,
समृध्दी कॉम्पलेक्स- कळंबा रोड, तपोवन शाळेसमोर सायं ५ वाजता,
विक्रमनगर- जोशी गल्ली येथे ३ वाजता
नेहरु नगर, एलआयसी कॉलनी येथे सायंकाळी ४ वाजता,
कळंबा येथे सकाळी ६ वाजता
शिवगंगा कॉलनी सायं ४ वाजता
जीवबा नाना जाधव पार्क सायं ६ वाजता
बापूराम नगर बी.एड. कॉलेज हॉल सायं ५ वाजता
नेहरू नगर खत्री लॉन सायं ४ वाजता
नागाळा पार्क येथे सायं ५ वाजता
येथे शिबीरे संपन्न होणार आहेत. या शिबिराचा समारोप २१ जून रोजी सायं ४ वाजता वसंतराव देशमुख हायस्कुल, सानेगुरुजी वसाहत येथे होणार आहे. या शिबिरात महिलानी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सोशल वेलफेअरच्या अध्यक्षा सौ. प्रतिमा पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply