
कोल्हापूर: हिल रायडर्स अँडव्हेंचर फाउंडेशनच्यावतीने यावर्षीही पन्हाळगड ते पावनखिंड ही महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाशी निगडित साहसी राज्यस्तरीय पदभ्रमंती मोहीम आयोजित केली आहे. यंदाची ही 56 वी मोहिम असून या मोहिमेचे सहसंयोजक संवेदना सोशल फाउंडेशन आहेत.
पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली तीन टप्प्यात ही मोहीम आखली गेली आहे.
6व 7 जुलै, 20, 21 जुलै आणि 27 व 28 जुलै अशा तीन टप्प्यात यावर्षीची ही साहसी मोहीम पार पडणार आहे, अशी माहिती हिल रायडर्स एडवेंचर फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील आणि संवेदना सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शालेय युवक-युवतींना इतिहासाची ओळख व्हावी, त्यांच्या अंगी जिद्द, चिकाटी निर्माण व्हावी. तसेच अखंड स्वराज्याचा जयजयकार करत छत्रपती शिवराय व त्यांचे मावळे ज्या वाटेवरून गेले त्याच वाटेवरून या मावळ्यांच्या स्मृती जागवत बाजीप्रभू देशपांडे यांचा स्फूर्तीदायक रणसंग्रामाचे आठवण करत तेजोमय इतिहासाला उजाळा देण्यासाठी आजच्या पिढीला नवशक्ती देण्यासाठी ही मोहीम दरवर्षी आयोजित केली जाते. स्वराज्यरक्षणार्थ प्राणाची आहुती देणाऱ्या या नरवीरांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या मार्गावरून इतिहासाच्या पाऊलखुणा जपण्यासाठी युवक-युवतींनी या मोहिमेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 94 23 28 51 55 या क्रमांकावर संपर्क साधावा असे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.
Leave a Reply