
कोल्हापूर : योगाच्या नियमित सरावामुळे होणारे सर्वात महत्वाचे फायदे आहेत.सर्व स्तरांवर तंदुरुस्ती,वजनात घट,ताण तणावा पासून मुक्ती,अंर्तयामी शांतता,रोगप्रतिकारक शक्तीत वाढ,सजगतेत वाढ होते.,नाते संबंधात सुधारणा,
उर्जा शक्ती वाढते,शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते,अंतर्ज्ञानात वाढ सर्वांगीण विकास साधनारे म्हणजे योगासन यासाठी एबीपी स्पोर्ट्स यांच्या मार्गदर्शनाखाली वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट व यांच्यावतीने शुक्रवार दिनांक 21 जून 2019 रोजी शाहूपुरी व्यापार पेठ तुळजाभवानी मंदिर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर राजीव नागावकर( विश्व योगा योग आणि अध्यात्मिक सेवा संस्था कोल्हापूर सचिव योगा प्रशिक्षक) यांनी कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने केली. यांनी अष्टांगयोग, हठयोग व प्राणायाम आणि ओमकार याची माहिती देऊन प्रात्यक्षिक सह खेळाडू व पदाधिकारी यांच्याकडून करून घेतले, तसेच योग प्रशिक्षका सौ. सरिता पुरेकर यांनी सूर्यनमस्कार विषयी माहिती दिली. याबरोबर एबीपी स्पोर्ट्स चे संस्थापक अविनाश पाटील, त्यांनी मान्यवरांचा सत्कार केला, याप्रसंगी वुशू संघटनेचे उपाध्यक्ष सतिश वडणगेकर ,प्रशिक्षक अथर्व पाटील ,रोहित काशिद, निलेश कदम, अक्षय पवार ,भाग्यश्री पाटील, रेवती पाटील, मेघना परीट,मनाली नवत्रे, स्नेहल कांबळे, अनिल पुरेकर इत्यादीे खेळाडू प्रशिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन ढवळे तर आभार प्रदर्शन कृती पारेख यांनी केले.
Leave a Reply