वुशू संघटनेतर्फे पंचगंगा नदी बद्दल आपली कृतज्ञता

 

कोल्हापूर : पंचगंगा नदी ही पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी आहे. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा झाली आहे. पाच उपगंगांच्या संगमापासून तयार झाल्याच्या दंतकथेनुसार तिला पंचगंगा असे नाव पडले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे व औद्योगिकीकरणामुळे नदीमध्ये प्रदूषण होत आहे .
स्वतःचा, मुलाचा, लग्नाचा वाढदिवस अशा विविध उपक्रम आपण साजरी करतो खूप खर्च करतो,
वेळ खर्च करतो. पण नदी मातेचा उत्सव आपण मात्र विसरून जातो.जी नदी स्वतः घान होऊन आपल्याला
स्वच्छ अमृत पाजते तिलाच आपण विसरून जात आहे .प्रदूषणाचे अनेक कारणे आहेत. पण आपण आज तिचा
वाढदिवस साजरा करू ,या मंगल प्रसंगी वर्षातून एक दिवस नागरिकांनी पंचगंगा नदीमातेचे पूजन करावे.
सायंकाळी सहाला नदीच्या आरतीत सहभागी होऊन नदीप्रदूषण मुक्तीच्या उपक्रमात सहभागी व्हावे. यासाठी नमामि पंचगंगे संस्थेच्यावतीने पंचगंगा होम, पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या उपक्रमात वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट ने उपस्थित राहून पंचगंगा नदीबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी नेहमी नदीच्या सेवेसाठी तत्पर असणारे सेवकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये वुशू संघटनेचे उपाध्यक्ष सतीश वडणगेकर, नारायण माजगावकर ,राजेंद्र कुंभार, होळकर इत्यादी यांचा सत्कार करवीर पीठाधीश विद्यानरसिंहभारती शंकराचार्य यांच्या हस्ते करण्यात आला.घरातून कणकेचे जलचर (मगर, मासा, कासव, बेडूक इत्यादी) तयार करून नदीकाठावर घेऊन त्या ठिकाणी त्याची पूजा झाल्यावर आपल्या हाताने हे जलचर नदीतील जीवांना अर्पण कले.
याप्रसंगी माननीय सौ सौमीका महाडिक यांच्या हस्ते पंचांग पूजन आरती इत्यादी विधीप्रयोग कार्यक्रम करण्यात आले. हा उपक्रम नमामि पंचगंगे संस्थेचे उमाकांत रानिंगा यांनी आयोजित केला होता.
तसेच सौ.सौमिका महाडिक यांनी वुशू संघटनेच्या खेळाडूंना मार्गदर्शन व प्रोत्साहन देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!