
कोल्हापूर: रेनो हा भारतातील पहिल्या क्रमांकाचा युरोपियन ब्रँड असून त्यांनी नवीन ग्लोबल प्रॉडक्ट, रेनो ट्रायबर आज भारतात घोषणा केली आहे. रेनो ट्रायबर हा भारत आणि फ्रान्समधील रेनो टीमचा संयुक्त प्रकल्प आहे. तसेच हे जगातील पहिले असे वाहन आहे, जे विशेषतः भारतीय बाजारपेठांसाठी डिझाईन केले आहे.“ग्रुप रेनोकरिता भारत ही प्रमुख बाजारपेठ आहे. भारतात आम्ही नवतरुण आहोत, तरीही आमच्या महत्त्वाकांक्षा ही आमची धोरणात्मक योजना “ड्राईव्ह द फ्युचर” प्रमाणे मोठी आहे. 2022 पर्यंत आम्हाला आमची विक्री दुप्पट करायची आहे. या कारणास्तव आम्ही रेनो ट्रायबर ही आणखी एक अद्वितीय संकल्पना घेऊन आलो आहोत. जी प्रमुख भारतीय बाजारपेठ लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. रेनो ट्रायबरचा जन्म, विकास आणि निर्मिती भारतातील आहे, भारतीय ग्राहकांचा प्राधान्याने विचार करून ती बनविण्यात आली आहे. इतर देशांमध्ये उपलब्ध होण्याआधी ती भारतात उपलब्ध होईल. हे वाहन खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणार आहे,” असे ग्रुप रेनोचे सीईओ थिएरी बोल्लोरे रेनो ट्रायबरच्या अनावरणाप्रसंगी म्हणाले.रेनो ट्रायबरच्या डिझाईनिंग इनोव्हेशनविषयी बोलताना ग्रुप रेनोचे एक्झिक्युटीव्ह वाईस-प्रेसिडेंट लॉरेन्स वॅन देन ऍकर म्हणाले की, “ट्रायबर सोबत आमचे उद्दिष्ट्य हे आमच्या ग्राहकांच्या आयुष्यातील अनेक गरजांनुरूप परिवर्तन आणण्याचे आहे. मग हे ग्राहक पालक असू द्या, चाहते असो, मित्रांचा गट किंवा मग कुटुंबियांचा समूह असो, त्यांची ट्राईब (प्रकार) कोणतीही असली रेनो ट्रायबर त्यांना साजेशी ठरेल. ट्रायबरने भारतीयांची उत्सवप्रियता आणि शेअरिंग करण्याची नैतिक मूल्ये जपली आहेत; जी रेनोमध्ये एकसमान आढळतात. हे उत्पादन आकर्षक, वेगवान आणि संक्षिप्त डिझाईन उपलब्ध करून देते, यामधील जागेचे देखील पुन्हा नियोजन करण्यात आले आहे. आम्हाला आमच्या आधुनिक अद्वितियतेचा अभिमान वाटतो, ज्यामुळे 4 मीटरमध्ये लांबीचे आव्हान जादुईरित्या पूर्ण केले आहे!”
Leave a Reply