
कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेमध्ये दर्जा टिकवून निर्यात वाढवा, असे मत वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबईचे ए. ओ. कुरविला यांनी व्यक्त केले.कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स व राज्य सरकारच्या सहकार्याने एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर,मुंबईतर्फे येथील लहान उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांवर प्रशिक्षित करण्यासाठी येथील हॉटेल पॅव्हेलियन येथे चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी स्वागत करून उद्योग आणि व्यापाराला चालना मिळावी, संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य आहे, असे त्यांनी सांगितले. वर्ल्ड ट्रेड सेंटर,मुंबईचे मार्गदर्शक ए. एन. खेडेकर यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हा उद्योग केंद्राच्या एस. डी. शेळके यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या कार्यशाळाच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांना निर्यातील चालना मिळावी, हा प्रमुख उद्देश आहे. त्याचबरोबर त्यांनी अशा निर्यातीसाठी राज्य सरकार कशा प्रकारे सहकार्य करते यासंबंधी अधिक विस्ताराने मार्गदर्शन केले.राज्य सरकाराचे सल्लागार अनिर्बान गुप्ता यांनी मैत्री या पोर्टलच्या माध्यमातून निर्यातक्षम उद्योजकांना काय काय मदत करू शकते याविषयी माहिती दिली, तर ईईपीसीच्या वरुण च्युलेट यांनीही मार्गदर्शन केले.मानद सचिव संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी चेंबरचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, व्ही. व्ही. देशिंगकर, शीतल मिरजे, हरिभाई पटेल, सचिन मळणगावकर यांच्यासह ७० उद्योजक उपस्थित होते.
Leave a Reply