
कोल्हापूर: रेन ऑफरोड चॅलेंज असोसिएशनच्यावतीने ‘फोर बाय फोर ऑफरोड इव्हेंट’ या साहसी खेळांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पावसाळ्यातील दगडातून, चिखलातून, पाण्यातून गाडी यशस्वीरीत्या चालवण्याचे धाडसी चालकाचे कौशल्य या स्पर्धेतून स्पष्ट होणार आहे. भर पावसात गाडी चालवण्याचा थरार या स्पर्धेत पाहायला मिळणार आहे.
यावर्षी रविवारी 30 जून रोजी हा इव्हेंट आयोजित केला असून पन्हाळा येथील ज्योतिबा, दाणेवाडी, माले या परिसरात या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सकाळी दहा वाजता ज्योतिबा येथून या ऑफरोड इव्हेंटची सुरुवात होणार असून संध्याकाळी सहा वाजता या स्पर्धेचा समारोप होणार आहे. सहभागी ऑफरोडर्सना असोसिएशनच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे.
निसर्गाच्या सानिध्यात ओढा, पाणंद, खोल दऱ्या, उंचवटे, चिखल, डोंगर कपारीतून वाहन चालवण्याचे कसब, वाहनाची क्षमता, चालकाचे कौशल्य या जोरावर ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी पुणे, सातारा, फलटण, इचलकरंजी, सांगली, बेळगाव, गोवा या ठिकाणाहून स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्पर्धेमध्ये महिंद्रा थार, डीआय, मेजर, मारुती जिप्सी, टोयाटो या गाड्या असणार आहेत. स्पर्धेत एकूण 50 गाड्या सहभागी होणार असून आपत्कालीन व्यवस्थेसाठी ऍम्ब्युलन्स असणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप माने, प्रसाद माने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पत्रकार परिषदेला युवराज साळुंखे, ओंकार लिगाडे, प्रमोद पाटील, सुहास बेलेकर आदी उपस्थित होोते.
Leave a Reply